कारल्यामध्ये व्हिटॅमिन C चे समृद्ध स्त्रोत आहे, जे भरपूर अँटिऑक्सिडेंट गुणधर्मांसह असते. आपल्या शरीरासाठी अँटीऑक्सिडेंट आवश्यक आहेत कारण ते रोगप्रतिकारक पेशी आणि पांढऱ्या रक्त पेशी (डब्ल्यूबीसी) चे गुणाकार करण्यास मदत करते. हे केवळ रोगप्रतिकार शक्ती मजबूत करतेच शिवाय एलर्जी प्रतिबंधित करण्यास देखील मदत करते. चला तर जाणून घेऊ फायदे…
- कारल्याचा रस प्यायल्याने आपले यकृत बळकट होतच, त्याचबरोबर यकृताचे सर्व त्रास बरे होतात. दररोज नियमाने हे घेतल्यास एका आठवड्यात चांगले परिणाम दिसून येतात. कावीळ मध्ये देखील हे फायदेशीर आहे.
- रक्त स्वच्छ करण्यासाठी देखील कारलं अमृता सारखे आहेत. मधुमेहाचा आजारांसाठी देखील हे प्रभावी मानले आहे. मधुमेह असल्यास एक चतुर्थांश कप कारल्याचे रस, तेवढ्याच प्रमाणात गाजराचा रस पिणे शरीरासाठी फायदेशीर आहे.
- कारल्याची पाने किंवा फळाला पाण्यात उकळवून प्यायल्याने, रोग प्रतिकारक शक्ती वाढते, आणि कुठल्याही प्रकाराचे संसर्ग झाल्यास बरे होतात.
- उलट्या, जुलाब, किंवा कॉलरा झाला असल्यास कारल्याचा रसात काळंमीठ टाकून प्यायलास लगेच आराम मिळतो. जलोदर झाला असल्यास देखील दोन चमचे कारल्याचा रस पाण्यामध्ये टाकून प्यायल्याने फायदा होतो.
महत्वाच्या बातम्या –