‘कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार घाबरतंय’ – राहुल गांधी

नवी दिल्ली : गेल्या वर्षी नवे 3 कृषी कायदे पास करण्यात आले. देशभरातून त्याचा जोरदार विरोध झाला. काँग्रेसनेही त्याचा कडाडून विरोध केला होता. कृषी कायद्यांवर चर्चा न करता लागू केल्याचा आरोप काँग्रेसने केंद्र सरकारवर केला. आणि काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी कृषी कायदे रद्द करण्याची घोषणा केली.

कृषी कायदे (Farm Act) लागू करताना आणि आता कृषी कायदे मागे घेण्याच्या विधेयकावरही केंद्र सरकार (Centel Government) ने चर्चा केली नाही, चर्चा न करताच कृषी कायदे मागे घेतले. चर्चा करण्यासाठी केंद्र सरकार घाबरत आहे, असा आरोप काँग्रेसकडून केला जात आहे. विना चर्चा कृषी कायदे मागे घेतल्यावरून राहुल गांधींनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

सरकार चर्चेला घाबरत असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. सध्या दिल्लीत संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीचे नरेंद्र मोदींनी कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केल्यानंतर आज अधिकृतरित्या कृषी कायदे मागे घेण्यात आले आहेत.

कृषी कायदे मागे घेताना चर्चा व्हावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात येत होती. मात्र केंद्र सरकारने घाबरून चर्चा न करताच कृषी कायदे मागे घेतल्याचा आरोप करत राहुल गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या –