Share

आजपासून राज्यातील महाविद्यालये सुरु होणार

मुंबई – कोरोनामुळे गेल्या दीड ते दोन वर्षांपासून महाविद्यालये बंद होती. म्हणजेच जवळपास ५७८ दिवसांनी आज बुधवारी सर्व महाविद्यालये उघडली आहेत. राज्य सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या सूचनेनुसार कोरोनाच्या दोन्ही लस घेतलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये प्रवेश दिला जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार महाविद्यालयातील सर्व वर्ग सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, मॉडेल डिग्री कॉलेज तसेच स्वायत्त महाविद्यालये आजपासून सुरु झाली आहेत. दरम्यान महाविद्यालय सुरू करण्यापूर्वी संपूर्ण महाविद्यालय सॅनिटाइज करण्यात आले आहेत. यामध्ये एका वर्गात विद्यार्थी प्रवेश क्षमतेच्या ५० टक्के मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. तर उर्वरित विद्यार्थ्यांना ऑनलाइन व्यवस्था असणार आहे.

दरम्यान १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन सुविधा असणार आहे. तर दोन लशी घेतलेल्यांनाच महाविद्यालयात प्रवेश देण्यात येणार आहे. तसेच एका बाकावर केवळ एकाच विद्यार्थ्याला बसविणार येणार आहे. प्रत्येकाला मास्क, सॅनिटायजर व सुरक्षित अंतर राखणे बंधनकारक असणार आहे. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

महत्वाच्या बातम्या – 

मुख्य बातम्या

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon