Share

जाणून घ्या मिरची पिकासाठी अनुकूल हवामान

Published On: 

🕒 1 min read

उष्ण आणि दमट हवामानात मिरची पिकाची वाढ चांगली होऊन उत्पादन चांगले मिळते. मिरची पिकाची लागवड पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा या तीनही हंगामात करता येते.

पावसाळात जास्त पाऊस व ढगाळ वातावरण असल्यास फूलांची गळ जास्त होते. पाने व फळे कुजतात. मिरचीला 40 इंचापेक्षा कमी पाऊस असणे चांगले मिरचीच्या झाडांची आणि फळांची वाढ 25 ते 30 सेल्सिअस तापमानाला चांगली होते. उत्पादनही भरपूर येते. तापमानातील तफावतीमुळे फळे फुले गळ मोठया प्रमाणात होते. व उत्पन्नात घट येते. बियांची उगवण 18 ते 27 सेल्सिअस तापमानास चांगली होते.

पाण्याचा उत्महिन्यातम निचरा होणा-या ते मध्यम भारी जमिनीत मिरचीचे पिक चांगले येते. हलक्या जमिनीत योग्य प्रमाणात सेंद्रीय खते वापरल्यास मिरचीचे पिक चांगले येते पाण्याचा योग्य निचरा न होणा-या जमिनीत मिरचीचे पिक घेऊ नये.

पावसाळयात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमिन निवडावी. उन्हाळयात मध्यम ते भारी जमिनीत मिरचीची लागवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पिक चांगले येते.

महत्वाच्या बातम्या – 

बातम्या (Main News) विशेष लेख (Special Articles)

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon

🕘 संबंधित बातम्या