Buttermilk and Jaggery | ताकासोबत गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ फायदे

Buttermilk and Jaggery | टीम कृषीनामा: उन्हाळ्यामध्ये उष्माघात टाळण्यासाठी आणि शरीराला थंडावा प्रदान करण्यासाठी बहुतांश लोक ताकाचे सेवन करत असतात. ताकामध्ये आढळणारे गुणधर्म पचनसंस्थेसाठी देखील खूप फायदेशीर मानले जातात. ताकामध्ये आढळणारे गुणधर्म शरीराला ऊर्जा आणि पोषण देण्याचे काम करतात. त्याचबरोबर या वातावरणात ताकासोबत गुळाचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. गुळामध्ये आढळणारे गुणधर्म आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे ताकासोबत गुळाचे सेवन केल्याने अनेक आजार सहज दूर होऊ शकतात. ताकासोबत गुळाचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

सर्दी आणि तापामध्ये फायदेशीर (Beneficial in cold and fever-Buttermilk and Jaggery Benefits)

ताकासोबत गुळाचे सेवन करणे सर्दी-तापामध्ये फायदेशीर ठरू शकते. या दोन्ही गोष्टींमध्ये आढळणारे पोषक तत्वे आणि गुणधर्म सर्दी आणि तापाचा संसर्ग कमी करण्यास मदत करतात. गुळामध्ये प्रोटीन, कॅल्शियम, सेलोनियम, मॅग्नीज, कॉपर इत्यादी पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळून येतात, जे शरीराला मोसमी आजारांपासून दूर ठेवू शकतात.

पचनसंस्था निरोगी राहते (Digestive system remains healthy-Buttermilk and Jaggery Benefits)

ताक आणि गुळाचे सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत आणि निरोगी राहू शकते. प्राचीन काळापासूनच जेवणानंतर लोक गुळाचे सेवन करतात. कारण गुळ खाल्ल्याने पचन क्रिया व्यवस्थित होते. त्याचबरोबर ताक आणि गुळाचे एकत्र सेवन केल्याने पचनसंस्था मजबूत होऊ शकते.

अशक्तपणा दूर होतो (The weakness is removed-Buttermilk and Jaggery Benefits)

शरीरातील अशक्तपणा दूर करण्यासाठी ताकासोबत गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरू शकते. शरीरातील हिमोग्लोबिन कमतरता भरून काढण्यास गुळ आणि ताक मदत करते. कारण गुळामध्ये भरपूर प्रमाणात मिनरल्स आणि आयरन आढळून येते, जे शरीरातील अशक्तपणा दूर करण्यास मदत करते.

वजन कमी करण्यास मदत करते (Helps in weight loss-Buttermilk and Jaggery Benefits)

तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी उपाय शोधत असाल तर गुळ आणि ताक तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय ठरू शकतो. याचे सेवन केल्याने भूक नियंत्रणात राहते. वजन कमी करण्यासाठी तुम्ही रोज दुपारी किंवा संध्याकाळी ताकामध्ये गुळ मिसळून त्याचे सेवन करू शकतात.

ताक आणि गुळाचे एकत्र सेवन केल्याने आरोग्याला वरील फायदे मिळू शकतात. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने आरोग्याला पुढील फायदे मिळू शकतात.

डायबिटीस नियंत्रणात राहते (Diabetes remains under control-Benefits of Fenugreek Seeds)

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाणे मदत करू शकतात. मेथीचे दाणे कार्बोहायड्रेट शोषून घेण्यास मदत करतात. त्याचबरोबर मेथी इन्सुलिन तयार करते ज्यामुळे रक्तातील साखरेची वाढलेली पातळी कमी होऊ शकते. मेथीचे दाणे टाईप 2 डायबिटीससाठी एक सर्वोत्तम उपचार आहे. त्यामुळे तुम्ही जर डायबिटीसचे रुग्ण असाल तर सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते (Increases immunity-Benefits of Fenugreek Seeds)

मेथी दाण्यामध्ये सॅपोनिन नावाचे संयुग आढळून येते, जे शक्तिशाली अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण असते. सॅपोनिन रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने शरीर विषाणू आणि बॅक्टेरियासोबत लढण्यासाठी तयार होते. परिणामी रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते.

वजन नियंत्रणात राहते (Weight remains under control-Benefits of Fenugreek Seeds)

मेथी दाण्यांमध्ये विरघळणारे फायबर आढळून येते, जे पचनास मदत करते. त्याचबरोबर विरघळणाऱ्या फायबरमुळे बद्धकोष्ठताही दूर होते. सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने भूक कमी लागते. त्याचबरोबर सकाळी रिकाम्या पोटी मेथी दाण्याचे सेवन केल्याने मेटाबोलिजम वाढते आणि डायजेशन सिस्टीम चांगली होते. त्यामुळे रिकाम्या पोटी मेथी दाणे खाल्ल्याने भूक नियंत्रणात राहते. परिणामी भूक न लागल्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

टीप: वरील माहिती लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांचा सल्ला घ्यावा.

महत्वाच्या बातम्या

Cucumber Benefits | त्वचा दीर्घकाळ तरुण राहण्यासोबतच काकडी खाल्ल्याने त्वचेला मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Rose Water | चेहऱ्यावरील डाग दूर करून चमक वाढवण्यासाठी गुलाब जलसोबत वापरा ‘या’ गोष्टी

Immunity Power | इम्युनिटी पॉवर वाढवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Papaya and Besan | चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यासाठी बेसन आणि पपईचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Cucumber Benefits | त्वचा निरोगी राहण्यापासून ते वजन नियंत्रणात राहण्यापर्यंत ‘हे’ आहे रिकाम्या पोटी काकडी खाण्याचे फायदे