खानदेशात पणन महासंघासह भारतीय कापूस महामंडळाची कापूस खरेदी सुरू झाली आहे. सीसीआयने सुमारे ८० हजार क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी केली आहे. सीसीआयचे जळगाव, भुसावळ, जामनेर, पाचोरा, शहादा , शिरपूर तर महासंघाचे केंद्र भडगाव, धरणगाव, अमळनेर व मालेगाव येथे सुरू आहेत.
कोयनेतून ३५ हजार ६४३ तर राधानगरीतून १४०० क्युसेक विसर्ग
कापसाची खेडा खरेदी मागील आठवड्यात गतीने सुरू झाली. दर स्थिर असून, ४८०० ते कमाल ५१०० रुपये प्रतिक्विंटलचा दर खेडा खरेदीत शेतकऱ्यांना मिळाला. सीसीआय व महासंघाच्या केंद्रात १२ टक्क्यांच्या आर्द्रतेच्या कापसाला ५२०० रुपयांवर दर मिळत आहे. तर १५ टक्क्यांपेक्षा अधिक आर्द्रतेच्या कापसाला पाच हजार रुपयांपर्यंतचा दर मिळत आहे. या केंद्रात शेतकरी व किरकोळ व्यापारी कापूस विक्रीसाठी आणत आहेत.
लातूरमध्ये सोयाबीनच्या भावात १०० रुपयांनी घट
रावेर, यावल व चोपडा भागांतून मध्य प्रदेशातील व्यापारी कापूस खरेदी करीत आहे. एकाच शेतकऱ्याकडे ६० ते ७० क्विंटल कापूस असल्यास त्यांना खेडा खरेदीत ५१०० रुपयांचा दर मिळत आहे. तर १० ते २० क्विंटल कापूस विक्रीसंबंधी खेडा खरेदीमध्ये ४९०० ते ५००० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे.
जाणून घ्या ,रोज गूळ-जिऱ्याचे पाणी पिल्याने होणारे फायदे
https://t.co/1v1JH90KNg— KrushiNama (@krushinama) January 24, 2020