एखादा बिजनेस करावा म्हटलं तर त्यासाठी लागणारी जागा , भांडवल , पैसेअसे एक ना अनेक प्रश्न आपल्यला सतावत राहतात.जमशेदपूर येथे राहणाऱ्या दिलीप वर्मा आणि त्यांच्या पत्नी संगीता याना देखील काहीतरी बिजनेस करावा वाटत होता.मात्र त्यासाठी पुरेशी जागा,बिजनेस आयडिया काहीच नव्हते म्हणून मग त्यांनी शेती करायची ठरवली. तीहि घरातच !
या दोघांनी घरातच मशरूमच्या उत्पादनासाठी एक जागा तयार केली. मशरूमच्या उत्पादनासाठी त्या जागेत सूर्यप्रकाश पोहोचणार नाही अशी काळजी घ्यावी लागते. आतमध्ये पंखा लावून तिथलं तापमानही नियंत्रित ठेवावं लागतं. जास्त थंडीतही मशरूम्स उगत नाहीत. त्याचबरोबर उष्म्यामध्येही त्यांचा टिकाव लागत नाही.या सर्व गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी मशरूमचे पीक घेण्यास सुरवात केली.आणि कमी जागेत चांगली कमाई केलीय.
मशरूमच्या बिया गवतात गुंडाळून भिजवून सुकवल्या जातात. मग या बिया कॅरीबॅगनमध्ये ठेवून एका खोलीत लटकवून ठेवतात. जवळजवळ महिन्याभरात या बिया वाढून मशरून दिसू लागतात. याच काळात याला दिवसरात्र पाणी द्यावं लागतं. यासाठी एक विशिष्ट प्रकारचं इंजेक्शन वापरलं जातं. त्याचबरोबर वरून पाण्याचा शिडकावाही द्यावा लागतो.किमान एका महिन्यात तुम्हाला पीक मिळते असे त्यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पहिला निर्णय रायगड संवर्धनासाठी २० कोटी रुपये
कर्जमुक्ती योजनेसाठी शेतकऱ्यांच्या याद्या ह्या कुठे आणि कधी पाहायला मिळतील ; घ्या जाणून …..
कडुनिंबाचा पाला आणि देठ आपल्या आरोग्यास गुणकारी
दुधी भोपळ्यात दडलयं सुंदर त्वचेचं रहस्य ; घ्या जाणून कसे ते…