दुधी भोपळा (शास्त्रीय नाव: Lagenaria siceraria इंग्लिश: Bottle Gourd (बॉटल गूर्ड), Calabash (कालाबॅश) )ही वेलवर्गातील एक वनस्पती आहे. या वेलीला फळल्यावर दंडगोलाकार फळे लगडतात व त्यांना त्याच नावाने ओळखले जाते. ही फळे दुधट हिरव्या सालींची व आतून पांढऱ्या, तंतुमय गराची असतात.
दुधी भोपळ्याच्या आयुर्वेदिक औषधी गुणांमुळे त्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यात लोह, कॅल्शियम, फॉस्फरस व अन्य खनिजे तसेच क जीवनसत्व असतात. अन्नाव्यतिरीक्त दुधी भोपळ्याचा वापर इतरत्रही होतो. चांगला वाळलेला दुधी भोपळा नव्याने पोहायला शिकणारे आणि मासेमार पाण्यावर तरंगण्यासाठी वापरतात. वाळलेल्या भोपळ्याचा वापर एकतारी बनण्यासाठीही करतात.
हिरव्या भाज्यांमध्ये आपण दुधी भोपळ्याचीच गोष्ट घेतली तर या भाजीचं साल आणि रससुद्धा खूप फायदेशीर ठरतो. यामध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहायड्रेटचं प्रमाण असल्यानं हे सहज पचूनही जातं आणि त्यामुळेच, मधुमेहाच्या रुग्णांसाठी दुधी भोपळा खूप फायदेशीर ठरतो.
दुधी भोपळा चिरताना आपण त्याचं साल काढतो. पण या सालांचा लेप करून त्वचेवर लावल्यास त्यामुळे त्वचा तजेलदार होते. किंवा हाच दुधी भोपळा चिरून त्याचा गर तुम्ही पाय किंवा पायांच्या तळव्यावर चोळला तर पायांची उष्णता आणि त्यामुळे निर्माण होणारी जळजळ लगेचच थांबते.
याशिवाय दुधी भोपळा पोटाच्या विकारांकरताही खूप फायदेशीर ठरतो. दुधी भोपळ्याला मंद आचेवर भाजून त्याचा भरीत बनवा. त्यातील रस पिळून काढून त्यामध्ये थोडी साखर घालून प्यायल्यामुळे लिव्हर आणि पोटाच्या विकारांवर फायदा होता. गरम पाण्यात उकळून घेतलेल्या भोपळ्याचा रायता खाल्ल्यानं अतिसारावरदेखील आराम मिळतो.
महत्वाच्या बातम्या –
स्ट्रॉबेरी या फळांवर अधिक संशोधन करण्याची गरज – उद्धव ठाकरे
टोमॅटोचा वापर करून दूर होतील डार्क सर्कल