आता कृषिमंत्री जाणार दर १५ दिवसांनी शेतकऱ्यांच्या शेतावर

आपण शेतकऱ्यांशी संवाद साधला तर त्यामधून त्यांच्या संवेदना आपल्याला कळतात. त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी आपण शेतकऱ्यांना भेटायला हवे त्यांच्या बांधावर जाऊन त्याच्याशी संवाद साधा व त्यांच्या वेदना जाणून घ्या. पण त्याची सुरवात मला माझ्यापासूनच करावी लागेल आणि ती मी करणार  असून, त्यांना मी दर १५ दिवसांनी भेटायला जाईल शेतकऱ्यांच्या शेतावर जाईन. त्याचबरोबर कृषी सचिव, आयुक्‍तदेखील १५ दिवसांनी शेतावर जातील. खालच्या फळीतील सर्व अधिकाऱ्यांनी दर आठवड्याला तीन शिवारांना भेटी द्याव्यात, असे स्पष्ट निर्देश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.

मंत्री भुसे कृषी विभाग आणि शेतकरी संवाद कार्यक्रमात शुक्रवारी (ता.७) बोलत होते , की राज्यातील शेतकरी आत्महत्या ह्या वेदनादायी आहेत. शेतकरी वर्ग हे आपले दुःख, प्रश्‍न मांडण्यास घाबरतात आणि त्यातूनच पुढे त्यांच्या प्रश्‍नांचा गुंता वाढत जातो. गुंता वाढल्याने तो आत्महत्येच्या दिशेने वळतो. काही निवडक शेतकरीच मॉडेल म्हणून कृषी विभागाकडून पुढे आणले जातात आणि त्यामुळे प्रयोगशील शेतकऱ्यांच्या संख्येत वाढ होत नाही व त्या प्रयोगाला अपयश आले आहे. त्यामागे संपूर्ण जबाबदार हा कृषी विभाग आणि शेतकऱ्यांमधील होत नसलेला संवाद आहे.

हे सर्व थांबवण्यासाठी मी स्वतः कृषी सचिव, कृषी आयुक्‍त, विभागीय कृषी सहसंचालक, तालुका कृषी अधिकाऱ्यांसह सर्वच बांधावर जातील. तिथे जाऊन शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या वेदना जाणून घेईल. त्याकरिता वरिष्ठांना पंधरा दिवसाला दोन शिवारांना भेटी तर कनिष्ठ कर्मचाऱ्यांसाठी आठवड्याला शिवारभेटीचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आला आहे.

महत्वाच्या बातम्या –

काश्मीर आणि हिमाचलमध्ये बर्फवृष्टी तर विदर्भात पाऊस सुरु राहील

ठाकरेंनी महाराष्ट्राचं नेतृत्व करावं – खासदार संजय राऊत

‘शरद पवारांवर टीका करण्याचा बालिशपणा चंद्रकात पाटलांनी सोडून द्यावा’ – धनंजय मुंडे

उद्धव ठाकरे आज नाशिक आणि औरंगाबाद दौऱ्यावर ; पीक विमा केंद्राची पाहणी करुन तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधणार