‘पीकविमा कंपनी केंद्र व राज्य शासनातील काही नेत्यांचा शेतकऱ्यांवर दरोडा’ – राजू शेट्टी

उस्मानाबाद – पीकविमा कंपनी केंद्र व राज्य शासनातील काही नेत्यांच्या सोबतीने शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. मात्र, आपण हे होऊ देणार नाही. येत्या १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे पिकविम्याची पूर्ण रक्कम द्यावी, अन्यथा शेतकऱ्यांचा उद्रेक होईल, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी पीकविमा कंपनीला दिला आहे.

जिल्ह्यात सोयाबीन वाया गेले असताना पीकविमा कंपनीकडून केवळ कळंब तालुक्यातील सहा मंडळांनाच सोयाबीनच्या नुकसानीपोटी विमा अग्रिम देण्यात आला आहे. तसेच पुढे अंतिम पिकविम्यापोटी हेक्टरी केवळ दहा हजार रुपये देणार असल्याचे विमा कंपनीने जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीच्या बैठकीत सांगितले आहे.

शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे व शासनाच्या पंचनाम्यात नुसार शंभर टक्के विमा मंजूर व्हायला पाहिजे होता. जिथे विमा कंपनीचे दिवाळे निघण्याची वेळ आली आहे, पण त्याउलट विमा कंपनीला मिळालेली ५८१ कोटी रक्कम घशात घालून घेण्याचा डाव आहे. कंपनी विरोधात स्वतः शेतकऱ्यांमार्फत कायदेशीर कारवाई करणार आहेत, असेही शेट्टी यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –