प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त!

मुंबई – प्रधानमंत्री (Prime Minister) सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त पात्र शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना देण्यासाठी कृषी विभागाने नियोजनबध्द प्रयत्न करावे, अशा सूचना कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिल्या आहेत. आतापर्यंत या योजनेकरिता शेतकऱ्यांकडून शासनाकडे ७ हजार ५५४ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी बँकेकडे सादर प्रकरणे २ … Read more

कोविड-१९ आजाराने मृत पावलेल्यांच्या २ हजार ११६ वारसांना प्रत्येकी ५० हजारांची मदत – अमित देशमुख

लातूर – राज्य शासनाकडून कोविड-19 आजारामुळे दुर्देवाने मृत झालेल्या व्यक्तींच्या निकटच्या वारसांना रुपये 50 हजार इतके सानुगृह अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार जिल्ह्यात 3 हजार 495 इतके ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आजपर्यंत 2 हजार 116 इतक्या मयत व्यक्तींच्या वारसांच्या अर्जांना जिल्हा प्रशानाच्यावतीने मंजूरी देवून मदत निधी डी.बी.टी. द्वारे थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्नित … Read more

शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.७६ टक्के कर्ज रोखे २१ फेब्रुवारी २०२२ रोजी सममूल्याने परतफेड करणार

मुंबई – शासनाने खुल्या बाजारातून उभारलेल्या ८.७६ टक्के कर्ज रोखे (Debt securities) २०२२ अदत्त शिल्लक रकमेची २१ फेब्रुवारी २०२२ पर्यंत देय असलेल्या व्याजासह २२ फेब्रुवारी २०२२ रोजी  सममूल्याने  परतफेड करण्यात येणार आहे, अशी माहिती वित्त विभागाने दिली आहे. संबंधित कर्जावर २२ फेब्रुवारी २०२२ पासून व त्यानंतर कोणतेही व्याज अदा करण्यात येणार नाही. रोखे प्रमाणपत्र यांच्या … Read more

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी करा – अजित पवार

पुणे – जिल्ह्यातील कोविड बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता राज्य शासनाच्या कोविडविषयक नियमांची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्यावर भर देण्यात यावा, असे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले. पुढील आठवड्यातील कोविड संसर्गाची परिस्थिती पाहून निर्बंधात बदल करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असेही ते म्हणाले. विधान भवन येथे आयोजित … Read more

महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३३ अंतर्गत २५०० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री

मुंबई – महाराष्ट्र (Maharashtra) शासनाने 12 वर्षे मुदतीचे 2500 कोटीच्या 6.91 टक्के महाराष्ट्र सरकारचे विकास कर्ज 2033 ची रोखे विक्रीस काढले आहे. ही विक्री शासनाच्या अधिसूचनेत नमूद केलेल्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेला रकमेचा विनियोग महाराष्ट्र (Maharashtra) सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधीच्या खर्चास अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी अधिसूचना वित्त विभागाचे … Read more

मोठा निर्णय : आता सर्व दुकानांवरील पाट्या मराठीत

मुंबई – दुकानांच्या पाट्या मराठीत (Marathi) असण्याबाबत ‘महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) अधिनियम २०१७ हा अधिनियम लागू होत असल्याने दहापेक्षा कमी कामगार असलेल्या आस्थापना व दुकाने नियमातून पळवाट काढत असल्याचे आढळून आले. अशा प्रकारच्या तक्रारी शासनास प्राप्त झाल्या व त्यावर उपाययोजना करण्याची मागणीही होत होती. मंत्रिमंडळाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना ( नोकरीचे … Read more

स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाला निधी मिळण्याबाबत शासन निर्णय जारी

मुंबई – सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रयत्नातून मूर्त स्वरूप घेत असलेल्या स्व. गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार (Sugarcane workers) कल्याण महामंडळाला सर्व सहकारी व खाजगी कारखान्यातील ऊस गाळपावर प्रति टन दहा रुपये प्रमाणे ऊसतोड कामगार (Sugarcane workers)  कल्याण निधी उपलब्ध करून देण्याबाबतचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. सहकारी किंवा खाजगी साखर कारखान्याने … Read more

महाराष्ट्र शासन कर्जरोखे २०२२ ची ८.६६ टक्के दराने परतफेड

मुंबई – महाराष्ट्र Maharashtra शासनाने पूर्वी खुल्या बाजारातून उभारलेल्या 8.66 टक्के कर्जरोखे 2022 ची परतफेड दि. 25 जानेवारीं 2022 रोजी पर्यंत करण्यात येणार आहे, असे वित्त विभागाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, अधिसूचना क्र. एलएनएफ-10,11/प्र.क्र.2/अर्थोपाय दि.20 जानेवारी 2022 अनुसार 8.66 टक्के महाराष्ट्र शासन कर्जरोखे, 2022 अदत्त शिल्लक रकमेची दि.24 जानेवारी 2022 पर्यंत देय … Read more

महिला शेतकऱ्यांची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील – दादाजी भुसे

पुणे – राज्यातील महिला (Women) शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठी आवश्यक धोरणात्मक बदल करण्यात येतील. महिला (Women) शेतकरी आणि शेतमजूर यांचा सन्मान आणि  प्रतिष्ठा वाढविण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असून त्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे आवाहन कृषिमंत्री (Minister of Agriculture) दादाजी भुसे यांनी केले. राज्य शासनाच्या वतीने २०२२ हे महिला शेतकरी सन्मान वर्ष … Read more

कमाल वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा मोठा दिलासा

मुंबई – कोरोना काळात शासकीय सेवेसाठी परीक्षा होऊ न शकल्यामुळे अनेक उमेदवारांनी कमाल वयोमर्यादा (Age limit) ओलांडून आता त्यांना शासकीय सेवेची दारे बंद होतील की काय अशी भीती निर्माण झाली होती. मात्र आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सहानुभूतीपूर्वक यावर विचार करून अशी कमाल वयोमर्यादा (Age limit) ओलांडलेल्या उमेदवारांना एक वेळची विशेष बाब म्हणून … Read more