कापराचे दाहकविरोधी गुणधर्म स्नायूंच्या वेदनांच्या उपचारांमध्ये खूप प्रभावी आहेत. याव्यतिरिक्त वेदनादायक स्नायूंना मालिश करण्यासाठी कापूर तेलाचा वापर केल्यानं त्या भागात रक्तप्रवाह वाढतो. चला तर मग जाणून घेऊ कापराचे घरगुती फायदे…..
- पोटदुखी होत असेल तर ओवा आणि पुदिना यामध्ये कापराचे तीन थेंब मिसळावे आणि ते घेतल्याने पोटदुखी बंद होते. स्नायू आणि सांधे दुखत असतील तर कापराच्या तेलाने मालिश करावी. यामुळे वेदना थांबतील आणि आराम देखील लवकर मिळेल. जे त्वचेला खाज येत असले तर ज्या भागावर खाज येते तेथे कापूर लावल्याने खाज येणे बंद होईल. तसेच जर तुमचा कान दुखत असेल तर तुळशीच्या पानांच्या रसात कापूर विरघळून थोडेसे कोमात करून कानात घालावं यामुळे कान दुखी बरी होईल.
- कापूर हा फक्त आपण पूजेसाठी वापरतो. पण त्या व्यतिरिक्तही या कापराचे बरेच फायदे आहेत. जर तुम्हांला भाजले असले तर कापूर किंवा कापराचे तेल लावावं. यामुळे जळजळ दूर होण्यास मदत होईल. तसेच घरात कापराचा धूर केल्याने जंतू नष्ट होतात. यामुळे आजारांचा संसर्ग होत नाही.
- पाण्यामध्ये कापराच्या तुकड्यांची पूड करून मिसळावी, आणि ते पाणी घरात सगळीकडे शिंपडाव. त्यामुळे घरामध्ये मुग्यांचा त्रास कमी होईल. याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर ढेकण्याचा त्रास होत असले तर तो कमी करण्यासाठी कापराच्या वड्या एका कापडात बांधून ते बिछान्यात ठेवावं.
- तसेच दाट दुखत असल्यास वेदना होणाऱ्या ठिकाणी कापराची पावडर ठेवल्यास त्या ठिकाणी आराम मिळतो. घरात सुगंध दरवळत राहावा यासाठी कापूर वापरावा. कापराची वडी जाळून ठेवण्याने घरामध्ये सुवास नक्कीच पसरेल.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये २ ते ३ दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता
- दिवाळीत पावसाची शक्यता, राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार
- दिवाळीच्या आत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल – दादाजी भुसे
- जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यामध्ये मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर
- एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे २८ टक्के महागाई भत्ता; कर्मचाऱ्यांच्या घरभाडे भत्त्यातही वाढ