४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी उपलब्ध

अवकाळी पावसाने ८० टक्के खरीप हंगाम बाधित झाल्यानंतर मदत निधी साठी खेळखंडोबा सुरू आहे. तिसऱ्या टप्प्यासाठी जिल्ह्याची ४५.९८ कोटींची मागणी असताना प्रत्यक्षात २७.८१ कोटींचा निधी शासनाने उपलब्ध केला. चौथ्या टप्प्याच्या १८.७७ कोटींसाठी शेतकऱ्यांना पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात  काढणीला आलेले सोयाबीनला पूर्णतः सोडून गेला होता.

खानदेशात बाजरीचे क्षेत्र दोन ते अडीच हजार हेक्‍टरने वाढणार

सर्वेक्षणानुसार ३ लाख ७४ हजार ८०४ शेतकऱ्यांच्या २ लाख १२ हजार ३२९ हेक्टरवरील सोयाबीन, १ लाख ३५ हजार ४७२ हेक्टरवरील कपाशी, ११ हजार ३६ हेक्टरवरील ज्वारी, २ हजार ७०६ हेक्टरवरील तूर, ५ हजार ६३ हेक्टरवरील मका, ५ हजार ५३८ हेक्टरवरील धान, १२६ हेक्टरवरील उडीद तसेच ७४७ हेक्टरवरील इतर पिकांचे नुकसान झाले. एकूण ३ लाख ७३ हजार १९ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांवर नुकसान झाले. याव्यतिरिक्त ४५२ हेक्टर बागायती पिके व ७८ हेक्टरवरील फळपिकांचे नुकसान झाले होते.

परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा गहू पेरणीवर जोर

अवकाळी पावसाने केलेल्या नुकसानासाठी शासनाने प्रचलित हंगामी पिकांसाठी हेक्टरी आठ हजार व फळबागांसाठी १८ हजार रुपये अशी मदत जाहीर केली. पहिल्या टप्प्यात ७२.४० कोटी, दुसऱ्या टप्प्यात १५८ कोटींची मदत मिळाली.  तर तिसऱ्या टप्प्यासाठी ४५ कोटी ९८ लाख ९२ हजार ६६५ रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने केली असताना, सोमवारी म्हणजेच ३ जानेवारी २०२० रोजी २७ कोटी ८१ लाख ४३ हजार रुपये उपलब्ध झाले. त्यामुळे मदतीच्या चौथ्या टप्प्यासाठी पुन्हा प्रतीक्षा करावी लागणार आहे.