मुळयाचे पिक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे जास्त उत्पादन मिळण्यासाठी या पिकाला खते वेळेवर द्यावीत. जमिनीची मशागत करतांना चांगले कुजलेले शेणखत 25 टन दर हेक्टरी जमिनीत मिसळून द्यावे. मुळयाच्या पिकाला दर हेक्टरी 30 किलो नत्र 20 किलो स्फूरद आणि 80 किलो पालाश द्यावे.
स्फूरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धीमात्रा पेरणीपूर्वी द्यावी. नत्राची उरलेली अर्धीमात्रा ही बी उगवून आल्यावर म्हणजेच पेरणीनंतर 20 ते 25 दिवसांनी द्यावी. मुळयाच्या वाढीसाठी जमिनीत सतत ओलावा असणे आवश्यक आहे. कोरडया जमिनीत मुळयाची पेरणी करू नये. बियांची पेरणी केल्यानंतर लगेच हलके पाणी द्यावे. मुळयाच्या पिकाला हिवाळयात 8 ते 10 दिवसाच्या अंतराने आणि उन्हाळी हंगामात 4 ते 5 दिवसाच्या अंतराने पाणी द्यावे.
मुळयाची लागवड कमी अंतरावर करतात म्हणून जमिनीची मशागत चांगली करणे आवश्यक आहे. पिक कमी कालावधीत तयार होणारे असल्यामुळे सुरूवातीच्या काळात पिकात खुरप्याच्या साहायाने निंदणी वेळेवर करून पिक तण रहित करावे. साधारणपणे दोन निंदण्या कराव्यात. एक खोदणी आणि एक निंदणी सुरूवातीच्या काळात करावी. मुळे लांब वाढणा-या जातींना आवश्यकतेप्रमाणे भर द्यावी.
काळी अळी ( मस्टर्ड सॉ फलाय) – मुळयावरील ही एक प्रमुख कीड आहे. लागवड झाल्यावर आणि मुळयाची उगवण झाल्यावर सुरूवातीच्या काळात हया काळया अळीचा उपद्रव मोठया प्रमाणात होतो. हया अळया पाने खातात आणि त्यामुळे पानांवर छिद्रे दिसतात. हया अळीच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 मिली लीटर एन्डोसल्फान मिसळून पिकावर फवारावे. हया कीडीचा उपद्रव ढगाळ हवामानात जास्त प्रमाणात होतो. हया किडीची पिल्ले तसेच प्रौढ किडे पानांतील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने गुंडाळली जातात. रोप कमजोर होते. पिवळे पडून रोप मरते.
हया किडीच्या निचंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 20 मिलीलीटर डायमिथेईट मिसळून पिकावर फवारावे. मुळयाच्या पिकावर करपा रोग मोठया प्रमाणावर आढळतो. हया बुरशीजन्य रोगांच्या प्रादुर्भावामुळे पानांवर पिवळे फूगीर डाग अथवा चटटे पडतात. नंतर खोडावर आणि शेंगावर पिवळे डाग पडतात. पावसाळी हंगामात रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात होतो. हया रोगाच्या नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात 25 ग्रॅम डायथेन एम – 45 हे बुरशीनाशक मिसळून फवारणी करावी.
महत्वाच्या बातम्या –
- हर्बल तंबाखूच्या लागवडीला परवानगी द्या; सदाभाऊ खोत यांनी शरद पवार यांना पत्र पाठवून केली मागणी
- ग्रामस्थांना शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करुन द्या – सुनील केदार
- प्रशासनाने प्राप्त निधीनुसार नियोजित कामे पूर्ण करावी – यशोमती ठाकूर
- ऊसाचे फुटवे व्यवस्थापनाची जाणून घ्या माहिती फक्त एका क्लिकवर
- रोजच्या आहारात आयोडिनयुक्त मीठ वापरणे कां आवश्यक आहे? जाणून घ्या