हल्ली बाजारात सिताफळ मिळायला लागली आहेत. सीताफळ सगळ्यांनाच आवडतं पण त्याच्या खास फायद्यांबद्दल खूप कमी लोक जाणतात. सीताफळ अनेक आजारांवर उपायकारक आहे. बाहेरून थोडं कडक पण आतून नरम आणि खायला गोड असत. रोज एक सिताफळ खाल्ल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात यामधील न्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सीडेंट आणि पोटेशियम आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सीताफळ हे एक पौष्टिक फळ आहे. सीताफळ हे मुळचे वेस्ट इंडिज, दक्षिण अमेरिकेचे त्यानंतर ते भारतात आले सीताफळाचे झाड सहज कुठेही माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही केली जाते.
- सीताफळामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि रिबोफ्लेविन हे पदार्थ असतात. त्याने दृष्टिदोष कमी होण्यास मदत होते.
- हृदयाचे त्रास असणाऱ्यांनी सीताफळ नियमित खावे. हृदयाच्या सगळ्या आजारांवर सीताफळ हे अतिशय फायदेशीर आहे.
- सीताफळामध्ये व्हिटामिन बी-6चं प्रमाणात जास्त असतं. त्यामुळे अस्थमाचा त्रास रोखण्यात मदत होते.
- सीताफळ खाल्ल्याने शरीरास नायट्रिक अॅसिड मिळते. जे शरीरातील बीपीवर नियंत्रण ठेवते. म्हणून, उच्च बीपी ग्रस्त लोकांनी सीताफळ घेणे आवश्यक आहे.
- सीताफळ दात निरोगी आणि चमकदार बनविण्यास मदत करते. सीताफळ खाल्ल्याने दातांमधील कमकुवत आणि पिवळे पणा कमी होतो व दात पांढरे आणि चमकदार बनतात.
महत्वाच्या बातम्या –