सर्व पालेभाज्यांमध्ये पालक ही सर्वश्रेष्ठ भाजी आहे. पालक ही भाजी आहारात जेवढी महत्त्वाची आहे तेवढीच औषधी गुणधर्म असल्यामुळे आरोग्यदायीसुद्धा आहे. भारतामध्ये अगदी प्राचीन काळापासून पालकची लागवड केली जाते. पालकाची पाने ही फिकट हिरवी, टोकाकडे निमुळती, गुळगुळीत व पसरट अशी असतात.
मराठीत पालक, इंग्रजीत स्पिनॅच तर शास्त्रीय भाषेमध्ये स्पिनासिया एॅलेरेकिया या नावाने ओळखली जाणारी पालक भाजी चेनोपोडिएसी या कुळातील वनस्पती आहे. पालकाचे देशी पालक आणि विलायती पालक असे दोन प्रकार पडतात. आपण सहसा देशी पालकच आहारामध्ये वापरतो. चला तर जाणून घेऊ पालकाचा रस पिण्याचे फायदे….
- पालकामध्ये असलेले कॅरोटीन आणि क्लोरोफिल कॅन्सरपासून लढण्यास मदत करतात. याशिवाय पालकाचा रस प्यायल्याने डोळ्यांचे आरोग्यही सुधारते.
- पालकामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते. याच्या सेवनाने चेहऱ्यावर ग्लो येतो. पालकामध्ये व्हिटामिनचे प्रमाण अधिक असते. पालकाचा रस प्यायल्याने हाडे मजबूत होतात.
- पालकाच्या रस रक्तदाब नियंत्रणात राहतो.
- त्वचेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास पालकाचा रस प्यावा. पालकाचा रस प्यायल्याने त्वचा उजळते. केसांसाठी पालकाचे सेवन चांगले.
- पाचनक्रिया सुरळीत राखण्यासाठी पालकाचा रस पिण्याचा सल्ला दिला जातो. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम पालकाचा रस करते. तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर पालकाचा रस प्यायल्याने फायदा होतो.
महत्वाच्या बातम्या –