तुप खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहीत आहेत का?

तुपाला भारतीय खाद्यसंस्कृतीत अगदी मानाचं स्थान आहे. अनेक खाद्यपदार्थांना तुपामुळे एक विशिष्ट स्वाद आणि सुगंध येतो. गरमागरम पुरणपोळी, मोदक, मुग डाळ खिचडी, शिरा असे  अनेक पदार्थ तुपाशिवाय पूर्णच होऊ शकत नाहीत. तूप आरोग्य आणि त्वचेसाठीदेखील फायदेशीर ठरतं. यासाठी प्राचीन काळापासून आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितलं जातं. तुपात मधूर, शक्तीशाली, पित्तशामक, मेद आणि शुक्रधातूंचे पोषण करणारे घटक असतात. चला तर मग जाणून घेऊयात फायदे….

आपण सारे एकमेकांचे बळ होऊयात – अशोक चव्हाण

  • तुपाचा तुमच्या मेंदूच्या आरोग्यावरदेखील चांगला फायदा होतो. ज्यामुळे तुमची स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. रिकाम्या पोटी तुपाचे सेवन केल्यास मेंदूच्या नसांना योग्य पोषण मिळते. नियमित तुप खाण्यामुळे तुम्हाला भविष्यात अल्झामर अथवा स्मृतीभ्रंश होण्याचा धोका कमी असतो.
  • लहान मुलांच्या वाढीसाठी आणि हाडांच्या मजबूतीसाठी तूप एक योग्य  आहार आहे. तुपातील ओमॅगा 3 फॅटी अॅसिडमुळे तुमची मजबूत राहतात.
  • डोळ्यांच्या समस्या असतील तर डोळ्यांमध्ये शुद्ध तूप टाकल्यामुळे चांगली झोप लागते. शिवाय शुद्ध तुपापासून तयार केलेले काजळ डोळ्यांमध्ये लावल्यास डोळ्यांना आराम मिळतो.

कापसाचे पैसे शेतकऱ्यांना केव्हा देणार?

  • पोटात अल्सरमुळे झालेले व्रण तुपाने बरे होतात. त्यामुळे अशा रुग्णांनी तूप सेवन केल्यास पोटात होणाऱ्या वेदनांमधून आराम मिळू शकतो.
  • नियमित आहारात तुपाचा समावेश केल्यास अथवा  झोपताना दुधात एक चमचा तूप टाकून प्यायल्यास सौचाला साफ होते. ज्यामुळे मुळव्याधीचा त्रास कमी होतो.
  • तुपामुळे शरीराला नैसर्गिक वंगण मिळते. शिवाय तुपात ओमॅगा 3 फॅटी असतात ज्यामुळे सांध्याचे कार्य सुधारते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होतो.

महत्वाच्या बातम्या –

आज ‘या’ जिल्ह्यात पावसाचा जोर वाढणार

भाजलेले चणे खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या