दही अथवा ताक शरीरासाठी उत्तम आहे आपल्याला माहीतच असेल. कारण अगदी प्राचीन काळापासून जेवणासोबत ताक पिण्याची पद्धत आहे. विशेषतः जड जेवणासोबत फोडणीचे अथवा मसाला ताक पिणे फायदेशीर ठरते. आयुर्वेदात तर ताकाला अमृतपेय असं म्हटलं जातं. कारण ताकामुळे तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स अर्थात विषद्रव्ये बाहेर टाकली जातात. शरीरातील उष्णता आणि दाह कमी करण्यासाठी ताक एखाद्या औषधाप्रमाणे काम करतं. दह्यात भरपूर पाणी टाकून घुसळून ताक केलं जातं. त्यामुळे दही आणि ताक यांचे शरीरावर होणारे फायदे नक्कीच वेगवेगळे आहेत. ताक प्यायल्यामुळे शरीर हायड्रेट राहतं. ज्यामुळे शरीराची पाण्याची पातळी संतुलित राहण्यास मदत होते. चला तर जाणून घेऊ फायदे….
अक्रोड खाण्याचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, तुम्हाला माहिती आहे का?
- ताक पिण्यामुळे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते. ज्यामुळे तुमचा रक्तदाबदेखील नियंत्रणात राहण्यास मदत होते. रक्तदाब नियंत्रित असल्यामुळे ह्रदयाचे आरोग्य सुधारते.
- ताकामुळे वातविकार, पित्तविकार आणि कफविकार बरे होतात. त्यामुळे ते त्रिदोषनाशक आहे.
- ताकामुळे वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर दररोज जेवणाच्या मधल्यावेळात भुक लागल्यावर ताक प्या. यामुळे तुमची भुक तर भागेलच शिवाय तुमचे वजनदेखील वाढणार नाही.
बडीशेप खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे
- ताक चवीला आंबटगोड लागते. ताक पाचक असल्यामुळे ते शरीरातील इतर पदार्थांचे योग्य पचन करण्यास मदत करते.
- ताक हे दह्यापासून तयार केलं जातं. ज्यामुळे ताकात पुरेशे कॅल्शियम असतं. ताक नियमित पिण्यामुळे तुमच्या शरीराची कॅल्शियमची कमतरता भरून निघू शकते.
- ताक प्यायल्यामुळे तुमची पचनशक्ती सुधारते. म्हणूनच जड जेवणासोबत ताक पिणे योग्य ठरते. अशा ताकात जिरेपूड, आलं आणि सैंधव मीठ असेल तर ताकाचा चांगला परिणाम शरीरावर लवकर होतो.
महत्वाच्या बातम्या –