सर्वसाधारणपणे ओव्याचा वापर स्वयंपाकामध्ये केला जातो. पण ओवा खाण्याचे अनेक फायदे आहे. पोटाशी संबंधित अनेक विकारांमध्ये ओवा गुणकारी आहे. शरीरात उदरातील जंतू मारण्यासाठी हि एक प्रभावशाली औषधी आहे. पोटदुखी, गॅसेस, उलट्या होणे, आम्लपित्त या सारख्या विकारांवर ओवा फायदेशीर ठरतो. सर्दी-पडसेवर देखील ओवा घेतल्याने फायदा होतो. चला तर जाणून घेऊ ओवा खाण्याचे अनेक फायदे…
- ओव्यामध्ये अनेक पाचक गुणधर्म असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारण्यासाठी दररोज स्वयंपाकात ओव्याचा वापर करा.
- ओवा आणि सैंधव एकत्र घेतल्याने जंताचा त्रास कमी होतो.
- अती प्रमाणात जेवण झाल्यास अथवा अपथ्यकारक पदार्थ खाण्याने तुम्हाला अपचनाचा त्रास होतो. अपचनामुळे पोटात गॅस झाल्यामुळे तुम्हाला अस्वस्थ वाटू लागते. अशा वेळी एखादे अॅंटासिड घेण्यापेक्षा ओवा तव्यावर तुपात भाजून तो कोमट पाण्यासोबत घेतल्यास त्वरीत आराम मिळू शकतो.
- सांधेदुखीचा त्रास होत असल्यास ओवा गरम करून त्याचा शेक घेतल्यास चांगला आराम मिळतो.
- दातदुखीवर ओवा उपयुक्त आहेच पण जर तुम्हाला तोंडातून दुर्गंधी येण्याची समस्या सतावत असेल तर पाण्यात लवंग तेल आणि ओव्याचे तेल टाकून गुळण्या केल्यास तोंडाची दुर्गंधी कमी होते.
- पित्ताचा त्रास असेल तर ओवा खाणे तुमच्यासाठी हितकारक आहे. यासाठी ओवा, सैधव आणि सुंठ एकत्र करून त्याची पावडर घ्या.
- कान दुखत असल्यास ओव्याचे तेलाचे काही थेंब कानात घालावे. ज्यामुळे कान ठणकणे कमी होते.
- ताप आल्यास ओवा आणि दालचिनी टाकलेला काढा प्या. ज्यामुळे तुम्हाला बरं वाटू लागेल.
महत्वाच्या बातम्या –
- मोठी बातमी – राज्यातील ‘या’ जिल्ह्यात आजपासून पुन्हा कडक लॉकडाऊन
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता
- जिल्ह्यात कडक निर्बंध लागू, जाणून घ्या काय सुरु, काय बंद राहणार?
- ड्रॅगन फ्रुटचे ‘हे’ आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- चेहऱ्यावर पडलेल्या सुरकुत्या कशा घालवाल? जाणून घ्या त्यासाठीचे घरगुती उपाय