आपली झोप कितीही झाली तरीही सातत्यानं आपल्याला थकल्यासारखं वाटत असतं. बऱ्याचदा आपल्याला काही काम न करताही थकवा जाणवतो. कधीकधी डोकं जड होतं तर काहीवेळा अंग दुखत राहातं. आपल्या शरीरातील ऊर्जा जास्त खर्च झाल्यानं सतत आपल्याला थकल्यासारखं होतं. काहीवेळा हा थकवा शरीरिक किंवा मानसिक दोन्ही प्रकारचा असू शकतो.
- तुमच्या आहारात भरपूर फळ, अंड, दुग्धजन्य पदार्थांचा वापर नसेल तर शरीरात आवश्यक ती प्रथिनं जात नाहीत. त्यामुळे तुम्हाला योग्य पद्धतीनं ऊर्जा मिळण्याचा स्रोत कमी होतो.
- आपल्या शरीराला किमान 7 ते 8 तास शांत झोपेची आवश्यकता असते. रात्री झोपताना मोबाईल, टॅबचा वापर केल्यानं लवकर झोप लागत नाही. काही वेळा झोपेत मध्येच आपण दचकून उठतो. भीतीनं किंवा टेन्शनमुळेही झोप पूर्ण होत नाही. मेंदू थकल्यामुळे दिवसभर थकवा जाणवतो.
- कुठल्याही प्रकारचं अगदी मद्य-सिगरेटपासून ते चहा कॉफीपर्यंत कोणतही व्यसन तुमच्या मेंदू आणि शरीरासाठी हानीकारक आहे. त्यामुळे तुमची झोप बिघडू शकते. आणि दिवसभर थकवा असल्यासारखं तुम्हाला जाणवू शकतं.
- आपल्या शरीराला उत्साही आणि आनंदी ठेवण्यासाठी किमान रोज सकाळी 30 मिनिटं वेगवेगळे व्यायाम करणं आवश्यक आहे. व्यायाम केल्यानं रक्ताभिसरण चांगलं होतं.
- तुम्ही एखाद्या मोठ्या संकटात असाल किंवला आर्थिक अडचण असेल किंवा कामाच्या ठिकाणचा ताण असेल या सगळ्या वातावरणामुळे तुम्ही मानसिकरित्या थकता. मेंदूला रिफेश होण्याची गरज असते. अशावेळी तुम्ही मेंदूवर अधिक ताण दिला तर थकवा जाणवतो.
- आपल्या आजूबाजूला अनेक नकारात्मक लोक असतात. नकारात्मक वातावरणात राहून तुम्ही सतत तसाच विचार करायला लागता. त्यामुळे आपला मेंदू आणि मन प्रसन्न राहात नाही. चिडचिड, राग, मत्सर, द्वेष यामुळेही मनसिकरित्या खचायला सुरुवात होते. अशावेळी लक्ष न लागणं, लक्ष विचलीत होणं आणि काही सुचत नाही म्हणून आळस येणं, अतिझोप येणं किंवा झोप उडणं असे प्रकार घडतात.
महत्वाच्या बातम्या –
- सावधान! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये उद्या वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- भरती प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवावी – दत्तात्रय भरणे
- हरभरा लागवड, जाणून घ्या फक्त एका क्लीकवर…
- अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या लोकांना लवकरच नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरु – वर्षा गायकवाड