जवस खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहे का?

जवसाचे औषधी गुणधर्म आश्चर्य वाटावे असे आहेत. त्याचे गुणधर्म परदेशात संशोधन झाल्याशिवाय आपल्याला समजत नाहीत पण आता अमेरिकेतल्या काही संशोधकांनी जवसामध्ये ओमेगा – ३ या नावाचे अँटी अॅसिड असते असे दाखवून दिले. हे अॅसिड डॉक्टरांच्या भाषेत सांगायचे झाले तर गुड ड्रग आहे. त्याशिवाय लिग्नन नावाचा घटक जवसात आहे आणि त्याच्यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे ते अनेक रोगांना प्रतिबंध करणारे आहे. कर्करोगापासून सुटका करणारे फायबर जवसामध्ये विपुल असते. चला तर जाणून घेऊ फायदे……

  • जवस खाल्याने ब्लड शुगर लेव्हल नॉर्मल राहते. ज्यामुळे डायबिटीज नियंत्रित राहते.
  • जवस खाल्ल्याने बॉडी हायड्रेट राहते आणि स्किनचा ग्लो टिकून राहतो .
  • जवसामधील अँटीऑक्सींडेंट्स बॉडीला डिटॉक्स करतात ज्यामुळे लिव्हर प्रॉब्लेम दूर होते.
  • केस राहतात निरोगी आणि सुंदर. कोरड्या केसांसाठी गुणकारी औषध आहे. कोंडा, खाज, आणि केसगळती सारख्या समस्यांपासून दूर राहू शकतो.
  • जवस खाण्यामुळे भूक नियंत्रित राहण्यास मदत होते. फायबर्सही मुबलक असते. त्यामुळे वजन आटोक्‍यात राहण्यास मदत होते. जवस खाल्याने ब्लड शुगर लेवल कमी होते.

महत्वाच्या बातम्या –