मशरुम खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

मशरुम म्हटलं की अनेकांचे चेहरे वाकडे-तिकडे होतात. खुप कमी लोकांना मशरुम आवडतं. मात्र मशरुम आरोग्यासाठी फायदेशीर आहे, हे खूप कमी लोकांना माहित आहे. मशरुममध्ये अनेक महत्वपूर्ण खनिजं आणि व्हिटॅमिन असतात. त्यामुळे मशरुम खाणं खूप गरजेचं आहे. शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी आपण अनेक उद्योग करत असतो. मग त्यात आजपासून जेवणात मशरुमचा समावेश करा… चला तर जाणून घेऊ फायदे…

  • मशरुम कॅन्सरच्या पेशींवर आळा घालण्यासाठीही मशरूम उपयुक्त ठरते. एका संशोधनातून सिद्ध झाले आहे की, मशरूम खाल्यानं कॅन्सरपासून शरीराचा बचाव होतो.
  • मशरूममध्ये कार्बोहाइड्रेट्सचे प्रमाण कमी असते. ज्यामुळे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते तसेच शरीरातील साखरेचे प्रमाणही नियंत्रणात राहते. त्यामुळे आरोग्य चांगलं राहू शकतं. म्हणुन रो़जच्या जेवणात थोडं तरी मशरुम खाणं गरजेचं आहे.
  • सध्या लठ्ठपणाचं प्रमाण वाढत चालल्यामुळं कोलेस्टेरॉलच्या प्रमाणात खुप वाढ आहे. मधूमेहाच्या लोकांना कोलेस्टेरॉलचा खुप त्रास होतो. मधुमेहाचं प्रमाण वाढलं तर कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढतं आहेय. त्यामुळं मधुमेह असलेल्या लोकांनी मशरुम खा.
  • शरुममध्ये व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असते. शरीरात व्हिटॅमिनची भरपूर आवश्यकता असते. व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन डी, बी 12 यांची शरीरात योग्य प्रमाणात गरज असते.
  • प्रत्येक व्हिटॅमिनचं आपलं वेगळं वेगळं कार्य असतं ते कार्य सुरळीत ठेवण्यासाठी शरीरात सगळ्या व्हिटॅमिनची गरज असते. मशरुममध्ये व्हिटॅमिनचं प्रमाण जास्त असल्यामुळे मशरुम खाणं खुप आवश्यक आहे.
  • मशरुममध्ये अनेक आजार दूर करण्याची ताकद आहे. अनेक गोष्टींवर मात करण्यासाठी मशरुम उपयुक्त आहे. रोज नाही तर हफ्त्यातून एक दिवस मशरुम खा. आरोग्यदायी ठरेल.

महत्वाच्या बातम्या –