निरोगी आरोग्याला ‘या’ पालेभाज्या आहेत फायदेशीर, जाणून घ्या

 

जेवणात पालेभाज्याला खूप महत्व आहे. कारण पालेभाज्यामुळे आरोग्य निरोगी राहते. अनेक पालेभाज्या आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. अशाच काही भाज्या या आरोग्यदायी आहेत. चला तर जाणून घेऊ पालेभाज्या…

  • कोथिंबीर – उष्णता कमी करणारी, पित्तनाशक आहे. हृदरोगावर अतिशय उपयुक्त
  • घोळ – मूळव्याध कमी करण्यास ही भाजी उपयुक्त. तसेच लघवीला साफ होते.
  • हादगा – पित्त, हिवताप, खोकला कमी करणारी भाजी. या भाजीच्या फुलाच्या रसाचे दोन थेंब काही दिवस डोळ्यात घातल्यास रातआंधळेपणा कमी होण्यास मदत होतो, असे सांगितले जाते. हा फुलांचा रस मधातून घेतल्याने छातीतील कफ पातळ होतो.
  • पालक – पचनसंस्था आणि मूत्रसंस्था यांच्या आतील सूज कमी करुन मऊपणा आणण्यास उपयुक्त आहे. दमा आणि खोकला कमी करणारी ही भाजी आहे.
  • शेपू – वातनाशक आणि पोटदुखी कमी करणारी अशी ही भाजी आहे.
  • कडूलिंब – पित्तनाशक आणि कृमीनाशक म्हणून याचा उपयोग

महत्वाच्या बातम्या –