तुम्हाला माहित आहे का कांदा चिरताना डोळ्यात पाणी का येतं? जाणून घ्या

अनेक जण मोठ्या हौशीने जेवण बनवण्यासाठी सज्ज होतात. मात्र जेवणची तयारी करताना कांदा कापण्याची वेळ आली की अनेकांना नकोसे वाटते. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येणं, डोळे चुरचुरणे अत्यंत त्रासदायक असते. त्यामुळे यापासून अनेकजण लांब पळतात. पण काही पदार्थांची लज्जतच कांद्यामुळे वाढते परिणामी कांदा कापणं अटळ असते.

कधीही कुणीही कांदा कापला तर त्याच्या डोळ्यातून पाणी का येत? या मागचं कारण आपण आज जाणून घेणार आहोत. कांदा हा अनेक पापुद्रांनी बनलेला असतो. यामध्ये प्रॉपेंथियल-एस-ऑक्साइड नावाचं रसायन असतं. हे रसायन कांदा कापताना आपल्या डोळ्यातील लेक्राइमल ग्लँडला उत्तेजित करतात. कांदा कापताना डोळ्यातून पाणी येते त्याचा थेट संबंध कांद्यातील घटकांशी आहे. कांद्यात काही गंधकयुक्त संयुगे असतात तशी काही एन्झाइमदेखील असतात. ज्यामुळे आपल्या डोळ्यातून कांदा कापताना पाणी येतं.

पण कांदा कापला गेला की त्या संयुगांचे रुपांतर अॅसिडमध्ये होते आणि एन्झाइम अॅसिडचे रुपांतर गंधकयुक्त ऑक्साईडमध्ये होते. हे रसायन बाष्पनशील असते त्यामुळे त्याचे रुपांतर वायूत होऊन ते थेट डोळ्यात शिरते.

बाष्पनशील असलेल्या या रसायनाचे रुपांतर वायूत होतं. हा वायू थेट डोळ्यात जातो. या वायूतील सलफ्युरिक ऍसिड डोळे चुरचुरण्यास कारणीभूत असतात. यामुळे डोळ्यातून पाणी येते.

खूप जणांना कांदा कापताना अतिशय त्रास होतो. यावेळी खालील उपाय करा.

  • कांदा कापण्यापूर्वी 20 ते 25 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा
  • कांद्याचे दोन भाग केल्यानंतर पाण्याने भरलेल्या भांड्यात बुडवून ठेवा
  • कांदा कापल्यावर वाहत्या पाण्याखाली म्हणजे नळाखाली धरा
  • कांदा कापताना सर्वात प्रथम खालचा पांढरा भाग काढून टाका

महत्वाच्या बातम्या –