सौंदर्य म्हटलं की आपल्याला आठवते ते चेहरा व केस. चेहऱ्यावरील डाग व मुरुमं हटवण्यासाठी अनेक उपाय केले जातात मात्र, पायाच्या सौंदर्याकडे फारसं लक्ष दिलं जातं नाही. भेगाळलेल्या टाचा म्हणजे, तरूणी आणि महिलांसाठी एक समस्याच… यामुळे अनेकदा स्टायलिश फुटवेअर्सना बाय-बाय करत, टाचा झाकून जातील अशा फटवेअर्सचा वापर करावा लागतो.
टाचांना भेगा पडण्याचे मुख्य कारण म्हणजे शरीरातील कॅल्शिअम आणि स्निग्धतेची कमतरता होय. पायाची त्वचा जाड असते. त्यामुळे शरीरात तयार होणारे सिबम (तेल) पायाच्या बाहेरच्या भागांपर्यंत पोहचत नाही. शिवाय पौष्टिक घटक व योग्य स्निग्धता न मिळाल्यामुळे टाचा खडबडीत होतात. व त्यावर भेगा पडू लागतात. टाचांच्या भेगांमुळे आग होणे, दुखणे हा त्रास होतो. शिवाय कधीकधी त्यातून रक्तही येते.
चला तर मग जाणून घेऊयात त्यासाठी काय उपाय आहेत –
- आपल्या पायांना माश्चराईजर लावून ओलावा दया यानंतर सुती मौजे घाला.
- तिळाचं तेलात नैसर्गिकरित्या मॉइश्चराइजर असते. जर तुमच्या टाचांना अधिक भेगा पडल्या असतील आणि त्यामुळं अनेक वेदना होतात. म्हणूनच झोपायच्या आधी रोज तिळाच्या तेलानं मसाज करा. तिळाच्या तेलात अँटी फंगल गुणधर्म आहेत. यामुळं पायाची डेडस्कीन काढण्यास मदत होणार आहेत.
- 2 चमचे कोरफडीच्या जेलमध्ये एक चमचा ग्लिसरीन घाला या नंतर गरम पाण्याने पाय धुवून या मिश्रणाने पायाला मसाज करा
- ऑलिव्ह ऑइलमध्ये औषधी गुणधर्म असतात. दोन चमचे ऑलिव्ह ऑइल गरम करुन कापसाच्या मदतीने टाचांना व पायाच्या तळव्यांना लावा. आठवड्यातून दोनदा असं करा किंवा रोज ऑलिव्ह ऑइलच्या सहाय्याने पायांना मसाज करा. एका आठवड्यात तुम्हाला फरक जाणवेल.
- सगळ्यात स्वस्त आणि गुणकारी तेल म्हणून राईचं तेल वापरलं जातं. देशात सहज राईचं तेल उपलब्ध होतं. राईचं तेल एका वाटीत सौम्य प्रमाणात गरम करून घ्या. नंतर कापसाच्या मदतीनं पायाच्या भेगांना लावा. या तेलाच्या साहाय्याने तुमच्या पायाचं सौंदर्य टिकून राहील.
- नारळात अँटीबॅक्टेरीअल गुणधर्म असतात. नारळाचे तेल सूज व इन्फेक्शन कमी करते. टाचांचा कोरडेपणा कमी करण्यासाठी रात्री झोपताना पायांना नारळाच्या तेलानं मसाज करा. जर कोरडेपणा अधिक असेल तर सकाळ सध्यांकाळ पायांना मसाज करा.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात होणार
- राज्यात उद्यापासून पावसाला होणार सुरूवात; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
- खुशखबर! १२ वी पास उमेदवारांनासाठी ‘या’ सरकारी कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी
- साबुदाणा खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे, जाणून घ्या
- सफरचंद खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवस जोरदार पावसाची शक्यता