आपण सुंदर दिसावे असे प्रत्येकाला वाटते आणि आपल्या चेहऱ्याचे सौंदर्य आपल्या ओठांवर असते. मात्र अनेकांचे ओठ काळे पडलेले असतात. सूर्याची अतिनिल किरणे, धुम्रपान, एलर्जी, विटॅमिन्सची कमतरता, वाढते वय, निर्जलीकरण आदी कारणांचा प्रभाव ओठांवर पडत असतो आणि ओठ काळे पडतात. मात्र आपण काही सोप्या टिप्स वापरुन काळे ओठ नैसर्गिकरित्या गुलाबी करु शकता. चला तर मग जाणून घेऊ घरगुती उपाय….
- जरासं मध आपल्या बोटावर घेऊन हळू-हळू ओठांवर चोळा. दिवसातून दोनदा ही प्रक्रिया अमलात आणा.
- स्ट्रॉबेरी मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या. या पेस्टमध्ये नारळाचे तेल मिक्स करून मिश्रण फ्रिजमध्ये ठेवून द्या. गरजेनुसार लिप बामचा वापर करा. थंडीमध्ये कोरड्या आणि फाटलेल्या ओठांवर उपाय म्हणून स्ट्रॉबेरी लिप बामचा वापर करा.
- कच्च्या दुधात केसर मिसळा आणि ओठांवर चोळा. दररोज ही प्रक्रिया अमलात आणल्यास काळपटपणा दूर होईल.
- बिटाचा रस काढल्यानंतर एका वाटीमध्ये तो गाळून घ्या. यानंतर बिटाच्या रसामध्ये तूप मिक्स करा. हे मिश्रण छोट्या डबीमध्ये साठवून ठेवा. लिप बामप्रमाणे या मिश्रणाचा वापर करा.
- त्वचेला उजळ करण्यासाठी लिंबू वापरला जातो, त्याच प्रकारे लिंबू ओठांची सुंदरता वाढवण्यात मदत करतं. पिळलेला लिंबू सकाळ- संध्याकाळ ओठांवर चोळल्याने काळपटपणा दूर होतो.
- एक चमचा दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. ही पेस्ट तुम्ही तुमच्या ओठांना लावा आणि पाच मिनिट्स तसंच राहू द्या. हळदीमध्ये असणाऱ्या अँटिसेप्टिक गुणांमुळे ओठ गुलाबी होण्यासाठी मदत मिळते
- ऑलिव्ह ऑईलचे 2-3 थेंब रोज ओठाला लावा. त्यामुळे तुमच्या ओठांचा काळेपणा कमी होईल आणि तुमच्या ओठांना हवा असणारा ओलावादेखील मिळेल.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यात उद्यापासून पावसाला होणार सुरूवात; ‘या’ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता
- सौंदर्य खुलवणारे आहेत ‘हे’ लिंबूचे उपाय ! जाणून घ्या
- राज्यात आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये पडणार मुसळधार पाऊस
- ‘या’ तारखेपासून राज्यात पुन्हा पावसाला सुरूवात होणार
- ‘हा’ उपाय करून एका मिनिटात घालवा दातांचा पिवळेपणा!
- काकडी लागवड पद्धत, माहित करून घ्या