जमिनीचे खरेदी-विक्री ही खरेतर किचकट प्रक्रिया. सर्वसामान्यांना त्याबाबत फारशी माहिती नसल्याने फसवणुकीचे अनेक प्रकार यापूर्वी घडलेले आहेत. एखाद्या शेतजमिनीची खरेदी वा विक्री झाली की, त्याची कागदपत्रे सादर करून सात बारा उताऱ्यावर तशी नोंद केली जाते. म्हणजे, आधीच्या मालकाचे नांव वगळून खरेदीदाराचे नांव सात बारा उताऱ्यावर लागते. खरेदी प्रक्रियेत संबंधित शेतजमिनीच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या नोंदींची जमवाजमव करावी लागते. या कामात गतिमानता व पारदर्शकता असायला हवी.
जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अनेक गैरप्रकार होतात, त्यामधूनच फसवणुकीच्या घटना ह्या उघडकीस आल्या आहेत. दस्तनोंदणीच्या वेळी असणारा हस्तलिखित सातबारा उताऱ्यावर दाखविलेली नावे आणि ऑनलाइन सातबारा उताऱ्यावर असलेली नावे यात खूप तफावत असल्याचे दिसूनआले आहे. त्याचप्रमाणे सातबारा उताऱ्यावरील क्षेत्र, आणि त्यावर काही बोजा आहे का, याची माहिती खरेदी करणाऱ्याला नसते. त्यामुळे जमीन खरेदी करणाऱ्याची फसवणूक करण्याचे प्रकार घडत आहेत. हा सर्व प्रकार थांबावा यासाठी ऑनलाइन सातबारा उतारा नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आय सरिता प्रणालीशी लिंक करण्यात आली आहे.
मात्र, ऑनलाइन दस्तनोंदणी करताना अनेक दुय्यम निबंधक ऑनलाइन सातबारा पाहत नाहीत. ऑनलाइन सातबारा उतारा पाचण्याचे हा दुय्यम निबंधक टाळत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. त्यामुळे ऑनलाइन सातबारा पाहूनच दुय्यम निबंधकांनी दस्तनोंदणी करावी, अशी सूचना राज्य सरकारने केली आहे.
तसेच जमीन खरेदी-विक्रीच्या दस्तनोंदणीच्या वेळी ऑनलाइन सातबारा व हस्तलिखित सातबारा याची पडताळणी दुय्यम निबंधक कार्यालयात होणारअसून त्यानंतरच दस्तनोंदणी करण्यात येणार आहे.
अनेक जमिनी या नियंत्रित सत्ताप्रकारात येतात. अशा जमिनींच्या खरेदी-विक्रीवेळी सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी असणे आवश्यक आहे. तसेच, आवश्यक ती नजराणा रक्कम सरकारदरबारी जमा करणे आवश्यक असते. जमीन खरेदी-विक्रीचे दस्त ऑनलाइन सातबारा पाहूनच नोंदविले जाणार असल्याने अशा व्यवहारांना चाप बसणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
कांद्याच्या भावात विक्रमी घसरण, बाजार समितीत कांद्याचे सरासरी भाव १८०० रुपयांपेक्षा कमी
केसांच्या सर्व समस्यांवर घरगुती तेल वापर
वस्तू खरेदी करून बिले संबंधित पंचायत समित्यांमध्ये सादर करा ; पुणे जिल्हा परिषदेने दिले आदेश