पावसाळ्यात ‘ह्या’ भाज्या चुकून सुद्धा खाऊ नका, जाणून घ्या

आला पावसाळा तब्येत सांभाळा, असं सर्रास म्हटलं जातं. पण तब्येत सांभाळा म्हणजे नेमकं काय? किंवा तब्येत सांभाळण्यासाठी आपण काय खावं आणि खाऊ नये हे लक्षात घेणं गरजेचं आहे. कारण त्यावरच आपल्या आरोग्याचं गणित अवलंबून असतं. भाजीमंडईत आपणाला हिरव्या,कोवळ्या लुसलुशीत पालेभाज्या व फळभाज्या पाहण्यास मिळतील. यावेळी या भाज्या घेण्यावाचून मोह आवरत नाही. आरोग्यासाठी या भाज्या उपयुक्त देखील असतात. पण या पावसाळ्याच्या काळात त्यांच्याकडे जरा दुर्लक्ष केलं तर बरं. पावसाळ्यात आहाराची काळजी घेण्याचे महत्त्वाचे आहे. नाहीतर याचा परिणाम आपल्या आरोग्यवर होवू शकतो.

मशरुम- अनेक वेळा मशरुम खाल्ल्यामुळे अनेक लोकांना अॅलर्जी होते. पावसाळ्यात मशरुम खाल्ल्यानं आपल्याला त्रास होऊ शकतो.या मोसमात मशरुम खाणं टाळायला हवं.

फ्लॅावर- पावसाळ्यात बटाटे,फ्लॅावर या आहारात न घेतलेल्याच आरोग्याच्या दृष्टीने चांगल. . कारण या भाज्या पचनासाठी जरा जड असतात. जर या भाज्या पचल्या नाहीत तर पोटात जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते.

पालक आणि कोबी- पावसाच्या मोसमात पचनशक्ती कमजोर होत असते. पालक,कोबी या भाज्यांमध्ये या काळात छोटे-छोटे कीडे, आळयादेखील आढळतात.हे कीडे जर खाण्यात गेले तर पचन तंत्र खराब होऊन पोटाचे विकार होऊ शकतात. यामुळे या भाज्यादेखील खाणं टाळलं पाहिजे

ढोबळी, वांगी, टोमॅटो- यांसारख्या फळभाज्या पावसाळ्यात खाणे योग्य ठरेल
या भाज्या कॅन्सरप्रतिरोधी अँटिऑक्सिडंट असल्याने फायदेशीर, परंतु ज्यांना किडनी विकार आहेत त्यांनी हे न खाणेच उत्तम.

लाल, दुधी भोपळा, कारले, पडवळ, दोडका- या वेलभाज्या पावसाळ्यात खाव्यात.
स्थूल, बैठी जीवनपद्धती असलेल्या, स्तनदा महिलांना, धमनीविकार असलेल्यांना, वयस्कर लोकांना या भाज्या खाणे जास्त उपयुक्त ठरेल.

महत्वाच्या बातम्या –