थंडीच्या दिवसात ‘हे’ फळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर, जाणून घ्या फायदे

रामफळ  हे एक मध्यम उंचीचे वृक्ष असून या झाडाची पाने पेरूच्या पानांसारखी असतात. हे झाड कमी प्रमाणात आढळते. रामफळ हे एक गोड फळ असून उन्हाळ्यात रामनवमी दरम्यान येत असते. फळाचे आवरण तपकिरी, केशरी रंगाचे असते. रामफळ हे सिताफळाच्याच जातीचे असते. चला तर जाणून फायदे….

  • रामफळातील व्हिटॅमिन सी घटक, फ्री रॅडिकल्सशी सामना करण्याची क्षमता शुष्क केसांची समस्या, अ‍ॅक्ने मार्क्स आणि कमजोर सांध्यांना बळकटी देण्यासाठी मदत करतात.
  • ऋतूमानात बदल झाल्यास तुम्हांला लगेजच त्रास होतो का ? तुमचं उत्तर ‘हो’ असल्यास यामागील एक कारण म्हणजे कमजोर रोगप्रतिकारशक्ती असू शकते. ती सुधारण्यासाठी रामफळ फायदेशीर ठरू शकते.  रामफळातील व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन बी घटक फायदेशीर ठरतात.
  • मधूमेहाचा त्रास म्हटला की आहारावर बंधनं येणार हे अटळ असते. मधूमेहींना अनेकदा मधल्या वेळेत भूक खाल्ल्यास नेमके काय खावे? हा प्रश्न पडलेला असतो. मधूमेहींसाठी रामफळ उत्तम आहे. रामफळाच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. सोबच रामफळात अ‍ॅन्टी कॅन्सर क्षमता आहे.
  • तिशी पार केलेल्यांमध्ये अ‍ॅडल्ट अ‍ॅक्नेचा त्रास असल्यास रामफळ त्यावर उत्तम उपाय आहे. रामफळाच्या सेवनामुळे त्वचेचे आरोग्य सूधारण्यासाठी मदत होते.

महत्वाच्या बातम्या –