ओल्या खोबऱ्यात व्हिटॅमिन, फायबर, कॅल्शियम, मिनरल्स भरपूर प्रमाणात असते. गृहिणी स्वयंपाकात खोबऱ्याचा वापर करतात नारळाचे उत्पादन मुख्यतः कोकणामध्ये होते नारळाला कल्पवृक्ष असेही म्हणतात. नारळाचं पाणी शरीरासाठी अतिशय पोषक असते. चला तर मग जाणून घेऊ फायदे…..
- ज्या लोकांना डोके दुखीचा त्रास होते अशा लोकांनी नारळाचे तुकडे जरूर खावे. त्यामुळे तुम्हाला अनेक फायदे होतील
- जर तुमचे पोट साफ होत नसेल तर तुम्ही नित्य खोबरे खा त्यामुळे पोट साफ होण्यास मदत होईल
- नारळाची करवंटी उगाळून किंवा करवंटीतून निघणाऱ्या तेलाचा उपयोग खरूज, नायटा किंवा पांढरे डाग घालवण्यासाठी केला जातो.
- अंगाची आग होत असल्यास किंवा रक्तातून रक्त पडत असल्याचं ओलं खोबरं, काळ्या मनुका आणि खडीसाखर एकत्र करुन खावं.
- अशक्त व्यक्ती असल्यास त्यांनी खडीसाखरेसोबत खोबरं खावं. तसंच वजन वाढत नसेल तर गुळ आणि खोबरं एकत्र खावं.
- पचनाच्या तक्रारींसाठी रोजच्या जेवणात पुदिना, आले, लसूण, कडिपत्ता व ओला नारळ यांची चटणी अवश्य खावी. याच चटणीत ओवा व सैंधव घातले असता वातामुळे शरीरात कुठेही कंप किंवा थरथरणे याने कमी होते
महत्वाच्या बातम्या –