शेतकऱ्यांनो जर तुमचा कापूस खरेदी होत नसेल, तर या थेट खंडपीठात

कापूस हे एक नगदी पीक आहे. कापसाला पाण्याचे आकर्षण आहे. सुती कपडे घातल्यास हाच गुणधर्म घाम टिपून घ्यायला मदत करतो. म्हणूनच उष्ण कटिबंधातील देशात सुती कपडे प्राधान्याने वापरतात. कापूस खूप मऊ असतो. कापसाच्या बियांना सरकी म्हणतात. सरकी हे गुरांचे खाद्य आहे तर सरकीचे तेल स्वयंपाकासाठी वापरायचे एक स्वस्त तेल आहे. या तेलाचा साबणाच्या आणि अन्य व्यवसायांत वापर होतो. त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्रात कापूस ह्या पिकाचे उत्पादन हे खूप मोठ्या प्रमाणावर आहे.

शेतकऱ्यांवर आता ” कोणी डॉक्‍टर देता का डॉक्‍टर” अशी म्हणण्याची वेळ आली

तसेच राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा शिल्लक राहिलेला कापूस 12 जून 2020 पर्यंत खरेदी करा, असा आदेश औरंगाबाद खंडपीठाने राज्य शासन व पणन विभाग यांना दिला आहे. त्याचप्रमाणे शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने कापूस खरेदी करणाऱ्या व्यापारी व एजंटवर शासनाने कारवाई करावी, अशी अपेक्षाही खंडपीठाने व्यक्त केली आहे.

तुळशीचा चहा पिण्याचे फायदे माहित आहेत का तुम्हाला, तर मग घ्या जाणून…..

जर शेतकऱ्याला शासनाच्या कापूस खरेदीबाबत तक्रार असेल तर शेतकऱ्यांनी त्यांच्या सातबाऱ्यासह थेट खंडपीठात दाद मागावी, अशी मुभाही न्यायमूर्ती टी. व्ही. नलावडे व न्यायमूर्ती श्रीकांत डी. कुलकर्णी यांनी दिली आहे. तसेच आता पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे शासनाकडे कापूस साठवणुकीची पुरेपूर व्यवस्था आहे काय, याची देखील खंडपीठाने विचारणा केली आहे.

महत्वाच्या बातम्या – 

जिप्त कडून तीन महिन्यांसाठी पांढऱ्या आणि कच्च्या साखर आयातीवर प्रतिबंध

८० वर्षे वयावरील सेवानिवृत्तीधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांना अतिरिक्त निवृत्तीवेतन – सुधीर मुनगंटीवार