किटकनाशके वापरतांना शेतक-यांनी काय काळजी घ्यावी ?

वर्धा – किटकनाशक हे मनुष्यासोबतच इतर प्राण्यांसाठी सुध्दा प्राणघातक आहे. त्यामुळे किटकनाशकाची फवारणी करतांना शेतक-यांनी काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हा कृषि अधिकारी एस.वाय.बमनोटे यांनी केले आहे.

प्रदूषणमुक्त मिठी नदीमुळे मुंबई सुरक्षित – पर्यावरणमंत्री रामदास कदम

किटकनाशकाच्या डब्यासह घडी पत्रिकेमध्ये किटकनाशांच्या दुष्परीणामावर करावयाच्या उपाययोजना छापलेल्या असतात. त्यांचे वाचन करुन सावधानी बाळगावी. किटकनाशके हाताळतांना रबरी मोजे घालावे. किटकनाशक द्रावण तयार करतांना काठी किंवा डाव वापरून  पाण्यात निट मिसळावे. फवारणी द्रावण तयार करण्यापासुन फवारणी पूर्ण होईपर्यंत डोळयावर चष्मा , हातामध्ये रबरी मोजे व तोंडावर मास्क अथवा उपरणे गुंडाळणे अंत्यत आवश्यक आहे. प्रकृतीची कुरबुर असल्यास (उदा. सर्दी, पडसे, ताप) फवारणी करु नये. फवारणीचे काम बालकावर सोपवू नये, व वा-यांच्या दिशेने करावी. . फवारणी वारा शांत असतांना सकाळी किंवा सायंकाळी करावी. फवारणी तिव्र उन्हात व वारा असतांना करु नये. फवारणीचे द्रावण तयार करण्यापासुन फवारणी पुर्ण होईपर्यंत फवारणी करणा-या सर्व व्यक्तींनी खाणे, पिणे, तंबाखू, धुम्रपान करु नये.

केवायसीच्या नावाखाली पेटीएमवापरकर्त्यांची फसवणुक

कृषि विद्यापिठ तसेच उत्पादक कंपनीने शिफारस केलेल्या मात्रे प्रमाणेच किटकनाशकाचे द्रावण तयार करावे. कोणत्याही परिस्थितीत किटकनाशकाचे प्रमाण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. फुटलेले किंवा मोडके स्प्रेपंप वापरु नये. चांगल्या प्रतिचा पंप व नोझल वापरावे. फवारणी शरीरापासुन लांबवर करण्याची काळजी घ्यावी. नोझल साफ करतांना तोंडाने फुंकर मारु नये.

द्राक्षबागा वाचविण्यासाठी पेपरचे आच्छादन टाकण्याचे काम सुरू

‘निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा आणि नुकसान भरपाई द्या’ ; राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश
फवारणी झाल्यानंतर साबनाने हात स्वच्छ धुवावे. डोके दुखणे, घाम येणे, मळमळ इत्यादी लक्षणे दिसल्यास फवारणी तात्काळ थांबवावी व फवारणी न झालेल्या मोकळया जागेवर सावलीमध्ये बसावे. किटकनाशकासोबत दिलेल्या घडी पत्रिकेमध्ये दिलेली उपाययोजना करावी. डोळे चुरचुरत असल्यास चूकूनही डोळयांना हात लावू नये. बशीमध्ये स्वच्छ पाणी घेउुन त्यात डोळा बुडवावा व डोळयाची उघडझाप करावी. असे पाणी बदलवून दोन तीन वेळा करावे. व जवळच्या डॉक्टरकडे तात्काळ उपचार घ्यावा. डॉक्टरांना घडी पत्रिका व किटकनाशकाचा डबा दाखवावा. थिमेट व फोरेट ग्रॅज्युस जिमिनीमधून दयावे. पाण्यातुन स्प्रेपंपाने फवारणी करु नये.

महत्वाच्या बातम्या –

३ महिने उलटून फ्लॉवर रोपांना कंदच आले नाही

चिकू महोत्सवाला सुमारे सव्वा लाख नागरिकांची उपस्थिती