सद्याच्या काळात शेतकरी हे सेंद्रिय शेतीकडे न वळता रासायनिक खताचा अतिरेक करत आहेत. पण सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे. ६०-७० वर्षांपूर्वी जी धान्य, भाजीपाला, फळे मिळायची ती पौष्टिक असायची. सेंद्रिय खत टाकल्यास जमिनीस नत्राचा पुरवठा होतो. हे नत्र झाडांच्या वेगवेगळ्या अवस्थांत उपलब्ध होऊन झाडे चांगली वाढतात. जर शेतकऱ्यांच्या जमिनीचा पोत सुधारायचा असेल तर त्यासाठी कुठली पिके फायदेशीर ठरतात हे पाहणे गरजेचे आहे. त्यामध्ये दिवसेंदिवस जमिनीचा खालावत चाललेला पोत कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनामध्ये पिकांची फेरपालट करुन कडधान्य पिकांची लागवड करणे गरजेचे आहे. असे मत भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी व्यक्त केले आहे.
पीकविमा अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र सुरू – अनिल बोंडे
भंडारा तालुका कृषी विभागाच्यावतीने खमारी बुटी येथे आयोजित केलेल्या जागतिक कडधान्य दिन कार्यशाळेत ते बोलत होते. त्यावेळी भाषणात कृषि अधिक्षक चव्हाण यांनी शेतकऱ्यांना दिवसेंदिवस बदलत चाललेली भौगोलिक परिस्थिती आणि सध्या होणाऱ्या वातावरणातील बदल यांचा पिकांवर खूप मोठा परिणाम होत आहे. यामुळे त्यांनी पीक पद्धती बदलण्याविषयी आवाहन केले. कृषी अधिकारी दीपक अहिर यांनी शेतकऱ्यांना रासायनिक खताचा अतिरेक कमी करा. तसेच सर्व शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळणे फार गरजेचे आहे असे सांगितले. त्याचबरोबर कृषि सहाय्यक हेमा तिडके यांनी जमिनीचा पोत कसा सुधारावा आणि शेतकऱ्यांना कडधान्य पिके हे कसे फायदेशीर ठरतील याबद्दल माहिती दिली.
महत्वाच्या बातम्या –
प्रक्रिया उद्योगामुळे मूल्यवर्धन होऊन शेतकऱ्यांना फायदा होईल – नवाब मलीक
मराठा आरक्षणाच्या निकालावरून मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला आनंद
अवकाळी पावसामुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईचे दावे आठवडाभरात निकाली काढणार – कृषिमंत्री