Share

दुपारी जेवण झाल्यावर झोपल्याने होऊ शकतात ‘या’ व्याधी

निरोगी आरोग्यासाठी झोप ही अत्यावश्यक आहे. दुपारी जेवण झाल्यावर झोप येतेच. मात्र, ही सवय आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक आहे. यामुळे शरीराला अनेक व्याधी जडतात. त्यामुळे या व्याधींपासून दूर राहायचे असेल तर दुपारची झोप टाळावी.

रात्री झोपण्याअगोदर खा उकळलेलं केळं

जखम न भरणे – कफदोष वाढतो. यामुळे पस निर्माण होऊन जखम चिघळू शकते.

मधुमेह वाढतो -पचनाची क्रिया असंतुलित होते. यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढतं.

जाणून घ्या कंटोळीचे फायदे…

अतिप्रमाणात वजन वाढणे – दुपारच्या झोपेमुळे शरीरात फॅट म्हणजेच मेदाचा संचय होतो. यामुळे अतिप्रमाणात वजन वाढण्याची समस्या निर्माण होते.

त्वचेचे विकार – कफ आणि पित्तदोष निर्माण होऊन अंगाला खाज येऊ शकते. याचसोबत रक्त दूषित होण्याचीही शक्यता असते. यामुळे एक्जिमा, सोरायसिस, शीतपित्त, तीळ आणि वांग यांसारखे त्वचेचे विकार बळावू शकतात. केसात कोंडाही होऊ शकतो.

 

मुख्य बातम्या आरोग्य

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon