शेतजमिनीच्या वरील बाजूस पावसाचे वाहून जाणारे पाणी आपत्कालीन वेळी पिकास उपलब्ध होण्याच्या दृष्टीने खोदलेल्या तळयास शेततळे असे म्हणतात. हे तळे नाला ओघळीचे काठावरील पड क्षेत्रात घेतले जाते.
शेततळे तयार करणे
- शेतजमिनीतील मोक्याच्या जागेची निवड करून चारही बाजूने खणावे. शेततळे किमान १ ते १.५ मीटर खोल असावे.
- या खड्ड्याच्या आतील बाजूने प्लास्टिक पेपर अंथरावा. (याला लायनिंग असे म्हणतात).
- हा प्लास्टिक पेपर साधारण १०० मायक्रोन आणि ४०० ते १००० गेज चा असावा.
- शेत तळ्याच्या बाजूच्या भिंतींचा कोन साधारण ४५ अंश च्या जवळ असणे महत्वाचे असते.
शेततळे तयार करताना घायव्याची काळजी
- शेततळे तयार करताना ज्या जमिनीत पाणी जिरण्याचे प्रमाण कमी आहे, अशा जागेची निवड करावी.
- शेततळ्याचे आकारमान निश्चित करण्यासाठी प्रथम तांत्रिक निकषाप्रमाणे शेततळ्याची जागा निश्चित करावी.
- चाचणी खड्डे घेऊन शेततळ्याची खोली निश्चिेत करावी.
- शेततळ्यात ज्या क्षेत्रातून पाणी येणार आहे, ते पाणलोट क्षेत्र निश्चित करून त्याचे क्षेत्र मोजावे.
- शेतातील पाण्याचा प्रवाह निश्चित करावा.
- शेततळ्याचे आकारमान ठरविताना पडणारा पाऊस व त्याची तीव्रता, पाणलोट क्षेत्राचा आकार व त्याचे गुणधर्म, तळ्याकरिता उपलब्ध जागा, भिजवावयाचे क्षेत्र व त्यात घ्यावयाची पिके निश्चित करावी.
- शेततळ्याचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्राच्या दोन ते अडीच टक्यांपेक्षा जास्त नसावे. साधारणतः दोन हेक्टर क्षेत्राकरिता २० X २० X ३ मी. (१२०० घनमीटर) आकारमानाचे शेततळे खोदावे.
- शेततळे बांधताना माती शेततळ्यात वाहून येणार नाही याची काळजी घ्यावी.
- ज्या ठिकाणी शेततळे बांधावयाचे आहे तो परीसर शक्यतो पावसाच्या पाण्यावर अवलंबून असावा.
फायदे
- पाणलोट क्षेत्रातील भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होते.
- आपत्कालीन स्थितीत पिकास पाणी देण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकते.
- पूरक सिंचनामुळे पिकाच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते.
- चिबड व पाणथळ जमीन सुधारणेसाठी शेततळयाचा चांगला उपयोग होतो.
- मत्स्यसंवर्धनासाठी उपयोग होतो
- पिकावर औषधे फवारणीसाइी शेतात मुबलक पाणी उपलब्ध होते
महत्वाच्या बातम्या –
- ई-पीक पाहणी मोबाईल ॲपमध्ये पीक पाहणी कशी नोंदवावी? घ्या जाणून
- जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा तर ‘या’ नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
- नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी अडचणी येत असून शेतकऱ्यांचे ऑफलाईन अर्ज स्विकारावेत – अमित देशमुख
- कारले लागवड व वाण, माहित करून घ्या
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची जोरदार पाऊस सुरुच; तर ‘या’ भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा