आपल्या आहारात आपण तेलाचा उपयोग रोजच करत असतो. प्रत्येकजण आपआपल्या आवडीनुसार तेलाचा वापर आपल्या स्वंयपाकात करत असतात. परंतु या तेलांचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो, याची आपल्याला पुरेशी माहिती नसते. बाजारात हल्ली शेंगदाणा, तिळ, मोहरी, सुर्यफूल, करडई, सोयाबिन, खोबरेल तेल अशी अनेक प्रकारची तेल उपलब्ध तर आहेत यातील नक्की कोणते तेल वापरावे? यासाठी जाणून घ्या तेलाचे फायदे…..
- सनफ्लावर तेल – या तेलामध्ये इ जीवनसत्व जास्त प्रमाणात असते तसेच सनफ्लावर तेलामध्ये सॅच्युरेटेड फॅट कमी असतात. सनफ्लावर तेलामध्ये पोली सॅच्युरेटेड फॅट आणि मोनो सॅच्युरेटेड फॅट योग्य प्रमाणात असतात, त्यामुळे ते कोलेस्टेरॉलची पातळी कमी करतात म्हणून सनफ्लावर तेल हृदयासाठी उपयुक्त आहे.
- खोबरेल तेल – खोबरेल तेलामध्ये सॅच्युरेटेड स्निग्धांशाचे सर्वात अधिक आहे. त्यानुसार हे खाण्यास अत्यंत घातक आहे असा निष्कर्ष निघतो. परंतु ह्यातील मीडियम चेन फॅटी अम्ल हृदयाला हितकार आहेत.
- राईचे तेल – हे खाद्यतेल मोहरीपासून बनविण्यात येते. स्वयंपाकात फोडणी करण्यास याचा वापर करतात, तसेच लोणच्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करतात. हे गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर होतो.
- सूर्यफूल तेल – हे तेल आपल्या आहारात उपयुक्त ठरते. कारण यात ई जीवनसत्त्व असते. त्याचबरोबर मोनू ऍण्ड पॉली अनसॅच्युरेटेड फॅटस्चे योग्य प्रमाण असते. हे रिफाइंड किंवा नॉनरिफाइंड प्रकारचे वापरले तरी चालते. हे तेल हृदयास हितकर आहे.
- तीळ तेल – तीळ तेलात मोनो आणि पॉलीसॅच्युरेटेड फॅटी ऍसिड्स असतात. तसेच तीळ तेलात फॅटमध्ये विरघळणारे अँटीऑक्सिडन्ट्स् असतात. या तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्याचे गुण आहे. हे तेल पचनाच्या समस्या जसे पोटातील वायू, बद्धकोष्ठता आणि पोटातील मुरडा यांवरही फायदेशीर ठरते. त्यात कॅल्शियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे ते वात आणि सांधेदुखीसाठीही उपयोगी आहे.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा
- सतत थकवा जाणवण्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या
- काजू खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..