खोकला एकदा झाला की तो पटकन बरा होत नाही अशी तक्रार आपण बऱ्याच जणांकडून ऐकत असतो. पण खोकल्यामध्येही काही प्रकार आहेत. त्यापैकी जर तुम्ही कोरड्या खोकल्याने त्रस्त असाल आणि हा खोकला बरा होत नसेल तर तुम्हाला काळजी घेणं आणि वेळेवर लक्ष देणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊ घरगुती उपाय….
- गरम दुधात केवळ हळद मिक्स करावी आणि त्या गरम दुधाचं सेवन करावं. त्यामुळे तुमच्या घशाला आराम मिळतो आणि कोरडा खोकला लवकरात लवकर दूर होण्यास मदत होते.
- खडीसाखर चघळत राहिल्यानेदेखील कोरडा खोकला बरा होण्यास मदत होते. इतकंच नाही तुम्ही खडीसाखरेची पावडर करून ती थोड्या थोड्या वेळाने खात राहिल्यासदेखील तुमच्या घशाला त्रास होत नाही. तसंच तुम्हाला वरचेवर जर खोकल्याचा त्रास होत असेल तर नेहमी खडीसाखर तुम्ही जवळ ठेवावी. यामुळे तुम्हाला कोरड्या खोकल्याचा त्रास होणार नाही. नियमित खडीसाखर खात राहिल्यास, तुमच्या घशावर प्रदूषणाचा परिणाम न होता खोकलादेखील दूर राहातो.
- तुम्हाला जर कोरड्या खोकल्याची उबळ येत असेल तर तुम्ही हळद, सुंठ आणि गूळ मिक्स करून त्याच्या गोळ्या बनवून ठेवा आणि साधारण अर्धा तासाने ही गोळी खा. फक्त एक लक्षात ठेवा या गोळीचा आकार अत्यंत लहान असणं गरेजचं आहे अन्यथा शरीरावर अन्य परिणाम होण्याची शक्यता असते.
- डाळिंबाची साल अथवा या सालीचा काढा करून त्यात तूप आणि सैंधव मीठ घाला. हे करून कोरड्या खोकल्यावर प्यायला दिल्यास, कितीही खोकला झाला असेल तरी त्वरीत बरा होतो.
महत्वाच्या बातम्या –
- ‘या’ जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा
- सतर्क राहा! राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आज वीजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता
- राज्यातील ‘या’ भागात पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडणार; हवामान खात्याचा इशारा
- सतत थकवा जाणवण्या मागचं कारण तुम्हाला माहित आहे का? जाणून घ्या
- काजू खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..