आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना आता पीककर्जाबरोबर गायी-म्हशींसाठी ही मिळणार कर्ज

आपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्‍यवसायाला संलग्‍न असा पशुपालन हा व्‍यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा घटक या व्‍यवसायावर अवलंबून आहे. दुग्‍धव्‍यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक धंद्याला तेजीचे स्‍वरुप आले आहे. वाढत्‍या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेतात. ग्रामीण भागात विविध स्‍वयंरोजगाराच्‍या संधी निर्माण झाल्‍यास तेथील बेरोजगारी कमी होण्‍यास व आर्थिक परिस्‍थिती सुधारण्‍यास मदतच होणार आहे.

बळीराज्यामुळेच आपण जगतो त्याला अशी भिक नका देऊ – रुपाली चाकणकर

राज्‍यात शेतीला पूरक व्‍यवसाय म्‍हणून दुग्‍ध व्‍यवसायाची जोड दिल्‍यास शेतक-यांना वर्षभर खात्रीशीर व सातत्‍यपूर्ण उत्‍पन्‍न मिळेल. तसेच राज्‍याच्‍या दूध उत्‍पादनात वाढ होऊन ग्रामीण भागात स्‍वयंरोजगार देखील निर्माण होईल. शेतीसाठी तर आपल्याला पीक कर्ज मिळते आता त्याचबरोबर पशुपालकांनाही कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यंदाही खरीप हंगामात पीक कर्जाबरोबरच आता पशुपालकांना जनावरांचा सांभाळ करण्यासाठी कर्जे देण्यात येणार आहे. राष्ट्रीय बँका, जिल्हा बँकेतून हे कर्जे उपलब्ध असतील. जनावरे, शेळ्यांबरोबर चक्कटपालन एक हजार कोंबड्यांसाठीही कर्जाची सुविधा आहे.

मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी आणणार कॅशबॅक स्कीम

तसेच तीन ते सहा महिन्यांच्या मुदतीचे हे कर्जे असून त्यासाठी ७ टक्के व्याज आकारले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्यात यासाठी देशी गाय, म्हशीसाठी १७ हजार ४६० रुपये, संकरित गाय, म्हृशीसाठी २० हजार २५० रुपयांचे तर शेळीसाठी २७००रुप यांचे कर्ज खेळते भांडवल म्हणून देण्यात येणार आहे.

शेतकऱ्याला सुलतानी जाचाने छळण्याचा हा प्रकार आहे – धनंजय मुंडे

त्याचबरोबर जनावरे, शेळ्यांबरोबरच कुक्कटपालन एक हजार कोंबड्यांसाठीही कर्जाची सुविधा आहे. यामध्ये गावरानसाठी १ लाख ५१ हजार, बाॅयलरसाठी १ लाख ६६ हजार रुपये देण्यात येतील. याचबरोबर मत्स्य व्यवसायासाठीही कर्जाची सुविधा दिली आहे. यामध्ये प्रति १० गुंठेसाठी २९ हजार ६०० रुपयांचे कर्ज दिले जाणार आहे. औषधी वनस्पतीसाठी प्रतिहेक्टरी ७५ हजार रुपये देण्यात येणार आहे.

काळी टोपी घालून राजभवनात बसून शेतकऱ्यांचं दु:ख कळणार नाही – राजू शेट्टी

या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी हा ४५ दिवसांचा ठेवण्यात आला आहे. त्यासाठी अग्रणी बँकेने ऑनलाइन कर्जमागणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. कर्जासाठी http://nicsolapur.in या संकेतस्थळावर अर्ज उपलब्ध आहेत.

महत्वाच्या बातम्या –

शेतकऱ्यांची दुसरी कर्जमाफीची यादी उद्या जाहीर करणार

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्यपालांकडून आर्थिक मदतीची घोषणा, प्रतिहेक्टरी मिळणार अवघे ८ हजार रुपये