आनंदाची बातमी; शेतकऱ्यांना आता पीककर्जाबरोबर गायी-म्हशींसाठी ही मिळणार कर्ज

आपला देश शेतीप्रधान आहे. या शेती व्‍यवसायाला संलग्‍न असा पशुपालन हा व्‍यवसाय फार पुरातन काळापासून केला जातो. समाजातील फार मोठा घटक या व्‍यवसायावर अवलंबून आहे. दुग्‍धव्‍यवसायातील नव-नवीन तंत्रज्ञानामुळे या पारंपरिक धंद्याला तेजीचे स्‍वरुप आले आहे. वाढत्‍या बेरोजगारीमुळे ग्रामीण भागातील तरुण शहराकडे धाव घेतात. ग्रामीण भागात विविध स्‍वयंरोजगाराच्‍या संधी निर्माण झाल्‍यास तेथील बेरोजगारी कमी होण्‍यास व आर्थिक परिस्‍थिती … Read more

आनंदाची बातमी : कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ हा १० मार्चपासून

‘महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेचा प्रत्यक्ष लाभ येत्या १० मार्चपासून मिळण्यास सुरुवात होईल, अशी माहिती राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. कर्जमाफी योजनेचा लाभ राज्यातील ३२ लाख शेतकऱ्यांना होणार असून त्यासाठी २९ हजार कोटी रुपये लागतील असा अंदाज आहे. कृषिपंपाना दिवसा जास्तीत जास्त वेळ वीज उपलब्ध करुन देण्यास प्राधान्य … Read more

आनंदाची बातमी : कापूस खरेदीसाठी 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस मान्यता

कापूस पणन महासंघास आवश्यक असलेल्या 1800 कोटी रुपयांच्या शासन हमीस बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून 2019-20 मध्ये किमान हमी भावाने खरेदी करण्यात येणाऱ्या कापसाचे चुकारे शेतकऱ्यांना वेळेत देण्यासाठी कापूस पणन महासंघाने बँक ऑफ इंडियाकडून 7.75 टक्के या व्याजदराने घेत असलेल्या 1800 कोटीच्या कर्जास ही शासन … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; ठिबकसाठी केंद्राकडून २९० कोटी रुपये मंजूर

राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक अनुदान वाटप करण्यासाठी केंद्राने यंदा २९० कोटी रुपये मंजूर केले आहेत. कृषीसंबंधित कोणत्याही योजनेच्या अनुदानासाठी एरवी सतत प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांना ठिबकबाबत मात्र दिलासा मिळतो आहे. ‘ठिबकसाठी भरपूर अनुदान आणि अर्ज कमी,’ अशी स्थिती तयार झालेली आहे. “राज्य शासनाने यंदा तयार केलेल्या ठिबक आराखड्यात केंद्राकडे ४८० कोटी रुपयांची मागणी केली आहे. अर्थात ही … Read more

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी ; आता शेततळ्यासाठी ९५ हजार रुपये अनुदान

राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेशी सांगड घालण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाचे 50 हजार रुपये अनुदान आणि मनरेगातून 45 हजार असे एकूण 95 हजार रुपयांचे अनुदान शेततळे खोदाईसाठी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिली. आतापर्यंत 1 लाख 61 हजार शेततळी पूर्ण करण्यात आली असून 2 लाख 30 हजार शेततळ्यांची आखणी करुन ठेवण्यात आली … Read more