उचकी लागणे म्हणजे छाती व पोट यामधील पडदा आणि बरगड्यांमधील स्नायू यांचे आकुंचन होणे व त्याचवेळेस स्वर यंत्रातील स्वरतंतु व्होकल कॉर्ड एकमेकांजवळ येणे. हे कार्य मज्जा संस्थेचे असते. मेंदूतून येणाऱ्या व्हेगस व फ्रेनिक या मज्जा तंतुच्या नसा उचकी लागण्यास महत्त्वाचे कार्य करतात. व्हेगस या नसेतून अन्ननलिका व जठराच्या आतील भागातुन संवेदना मेंदूकडे जातात. त्याने एका प्रक्षेपित क्रियेची सुरवात होते. छाती व पोट यामधील पडदा (डायफ्राम) व बरगड्यांमधील काही स्नायू आकस्मित कार्यान्वित होतात व स्वरतंतु जवळ येतात. चला तर मग जाणून घेऊ घरगुती उपाय …..
- उचकी आल्यावर एका चमचा लिंबाचा ताजा रस आणि एक चमचा मध एकत्र करुन त्याचे चाटण तयार करा. हे चाटण घेतल्यानंतर काही वेळात उचकी बंद होते.
- थंड पाणी प्या किंवा बर्फाचा खडा तोंडात ठेवून हळूहळू चोखा. हे उ केल्यानंतरच काही वेळात उचकी बंद होते.
- काळी मिरी वाटून बारीक चूर्ण करा. दोन ग्रॅम चूर्ण मधात मिसळून खा. हे केल्यानंतरच काही वेळात उचकी बंद होते.
- उचकी आल्यावर लगेच एक चमचा साखर खावी. साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबते.
- दालचीनीचा एक तुकडा तोंडात टाकून तो चघळा. हे केल्यानंतरच काही वेळात उचकी बंद होते.
महत्वाच्या बातम्या –
- मंत्रिमंडळ बैठकीतील मोठे निर्णय : दि. १३ ऑक्टोबर २०२१
- मोठा निर्णय: राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्तांसाठी १० हजार कोटींचे अर्थसहाय्य
- ‘या’ भागातील रहिवाशांना येत्या आठ दिवसात मिळणार हक्काचा सातबारा
- कोथिंबीरचे ‘हे’ फायदे तुम्ही नक्कीच वाचलेले नसणार…..
- विकासासाठी जमिनी देणाऱ्या बाधित शेतकऱ्यांचे पुनर्वसन वेळेत व्हावे – दादा भुसे
- जिल्ह्यातील आरोग्य विभागातील रिक्त जागा लवकरच भरणार – राजेश टोपे यांची माहिती