जिऱ्यामध्ये असलेल्या ‘मोलाटोनीन’ तत्त्वामुळे डायरिया, एसीडिटी, पोट दुखी, पोटातील कृमी या समस्या दूर होतात. ज्या लोकांना अन्न पचनाचा त्रास होतो त्यांच्यासाठी तर जिरे वरदान आहे. स्वयंपाक घरातील मसाल्यांमध्ये महत्त्वपूर्ण असलेलं जीरे दररोज चिमुटभर सेवन केलं तर झपाट्याने वजन कमी होतं. हे कोलेस्ट्रॉल लवकर घटवतं.
जिऱ्यामध्ये अँटी ऑक्सीडंटची मात्रा भरपूर असते. तसंच यामध्ये फायबर, कॉपर, पॉटेशिअम, मँगनीज, कॅल्शिअम, झिंक आणि मॅग्नेशिअम यासारखी मिनरल्सही आढळतात. जी शरीरातील विभिन्न भागांसाठी खूपच फायदेशीर असतात.
याचप्रमाणे लोहाचं प्रमाण अधीक असल्यामुळे शरिरातील रक्ताचं प्रणाम वाढवण्यास जिरे लाभदायक आहे. जिरे अँटीसेप्टीक असून, त्यामुळे सर्दी आणि कफ होत नाही. मुळव्याधीसाठीही गुणकारी आहे जिरे.लोहाचं प्रमाण अधीक असल्यामुळे शरिरातील रक्ताचं प्रणाम वाढवण्यास जिरे लाभदायक आहे. जिरे अँटीसेप्टीक असून, त्यामुळे सर्दी आणि कफ होत नाही. मुळव्याधीसाठीही गुणकारी आहे जिरे.
तसेच जिऱ्यामध्ये त्वचेसंदर्भातील आजारांना ठिक करण्याचे गुण असतात. एक्जिमासारख्या आजारावर जिऱ्याचा लेप लावण्यात येतो. हाताला घाम येत असल्यास जीरे पाण्यात उकळवावे आणि ते पाणी थंड करून तहान लागल्यावर प्यावे.
महत्वाच्या बातम्या –
- राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये आजपासून पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा
- आज ‘या’ जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता; हवामान खात्याचा इशारा
- जिल्ह्यात नव्या कोरोना बाधित रुग्णांच्या आकड्यात वाढ!
- ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबात यावर्षी मुलीचा जन्म झाला त्या शेतकऱ्यांना होणार रोपांचे वाटप
- गरजेपेक्षा जास्त पाणी पिणे शरीरासाठी घातक, जाणून घ्या
- उद्या दूध उत्पादक शेतकऱ्यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर होणार आंदोलन