आपल्या सर्वाना पाणी आपल्या शरीरासाठी पाणी किती महत्वाचे आहे. आपल्या शरीरात 60 टक्के पाणी असते. शरीरामध्ये लाळ निर्मिती, पचन, शोषण, रक्ताभिसरण, पोषक तत्त्वांचे परिवहन, शरीरातील तापमानाचे व्यवस्थापन, चयापचयातील विषारी पदार्थाचे विसर्जन आदी क्रिया होण्यासाठी पाणी अत्यावश्यक असते. मात्र, शरीरासाठी पाणी पिणे फायदेशीर असल्यामुळे काही लोक जास्त प्रमाणात पाणी पितात. निरोगी शरिरासाठी दिवसातून अडीच ते तीन लिटर पाणी पुरेसे आहे. मात्र काही लोक त्या पेक्षा जास्त पाणी पितात, त्यामुळे जास्त पाणी पिणे शरीरासाठी घातक ठरवू शक्यते. चला तर मग जाणून घेऊ….
- गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने ओव्हरहायड्रेशनची समस्या बळावू शकते. याचा परिणाम किडनीवर होतो.
- जास्त पाणी पिण्याने शरीरातील घातक गोष्टीबाहेर पडतात आणि शरीरात साठलेली जादा चरबी कमी होते.
- उन्हाळ्यात लोक घरात पाय टाकतातच थंडगार पाणी पितात. ज्यामुळे शरीराची मोठ्या प्रमाणात हानी होते.
- शरिरात जास्त प्रमाणात घेतलेले पाणी रक्तदाबात गतीने मिसळू शकते. त्यामुळे रक्तातील तरल पदार्थ पातळ होण्याचा धोका संभवतो.
- क्रोनिक किडनी डिसीज किंवा लिव्हर सिरॉसिस असे त्रास असतील त्यांनी प्रमाणात पाणी प्यायलं पाहिजे.
महत्वाच्या बातम्या –