कोणत्या-न्-कोणत्या अन्नपदार्थांमध्ये आपण वेलचीचा (Cardamom) वापर आवर्जून करतो. या छोट्या वेलची असंख्य आरोग्यदायी फायदे आहेत. वेलचीमध्ये कित्येक औषधी गुणधर्म आहेत, ज्यामुळे कित्येक गंभीर आजारांपासून आपलं संरक्षण होण्यास मदत होते. काळी वेलची आणि हिरवी वेलची असे दोन प्रकार आहेत. प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात मिळणारी वेलची केवळ आस्वाद आणि सुगंधासाठी वापरली जात नाही तर आरोग्यासाठीही वेलची अतिशय फायदेशीर असते. चला तर जाणून घेऊ फायदे….
- वेलची चहात टाकून घेतली की पोटावरची चरबी कमी व्हायला मदत होते. वेलचीनं पोटातला गॅसही निघून जातो
- वेलची खाल्ल्याने सर्दी आणि खोकला कमी होण्यास मदत होते. तुम्हाला जर कफ झाला असेल तर पाण्यात वेलची उकळून त्याचं सेवन करावं आराम मिळतो.
- वेलचीनं कोलेस्ट्रॉल कमी व्हायला मदत होते. वेलचीत सिस्टोलिक आणि डायस्टोलिक कमी करण्याची क्षमता असते. त्यामुळे रक्तदाब व्यवस्थित राहतो.
- हिवाळ्यात रोज चहामध्ये वेलचीचा वापर करावा. वेलची ही कफ आणि खोकल्याच्या आजारांपासून दूर ठेवण्यासाठी मदत करते.
- अॅसिडीटीपासून तुम्हाला सुटका हवी असेल तर वेलची उत्तम. त्यासाठी वेलची चावून चावून खाणे किंवा चघळणे चांगले. त्यातून निघणारे तेल तोंडातील लालेतील ग्रंथी मिळसते. त्यामुळे तुमचे पोट साफ होते.
महत्वाच्या बातम्या –