कारल्याचा चहा पिण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या

कडूपणासाठी प्रसिद्ध असलेले कारले आरोग्यवर्धक गुणधर्मासाठीही तितकेच प्रसिद्ध आहे. आशिया उपखंडामध्ये आहारामध्ये भाजी स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणात वापरही होतो. कारले हे कडू असले तरी आरोग्यासाठी अत्यंत फायद्याचे आहे.

कारल्याच्या रसापासून विविध पदार्थांना मागणी वाढत आहे. कारल्याचे वाळवलेले काप, भुकटी हे अधिक काळ टिकू शकतात. आरोग्यासाठी जागरूक लोकांमध्ये कारल्याच्या चहा लोकप्रिय बनत आहे. चला तर जाणून घेऊ फायदे…..

  • कारल्यातून फॉस्फरस आणि लोहासोबतच भरपूर प्रमाणात क-जीवनसत्त्व, आणि काही प्रमाणात अ-जीवनसत्त्व मिळते.
  • कारल्यातील “मोमोर्डिका चॅराटिया” या संयुगामुळे युकृतातील आरोग्यकारक विकरांमध्ये (एंझायम्स) वाढ होते.
  • कारल्यातील लोह आणि फोलिक आम्लामुळे हृदयरोग, पक्षाघात यांचा धोका कमी होतो. पोटॅशिअमचे प्रमाण भरपूर असल्याने, ते शरीरातील अतिरिक्त सोडियमचे शोषण करते. त्याचा फायदा रक्तदाब स्थिर ठेवण्यात होतो.
  • कॅलरी, मेद आणि कर्बोदकांचे प्रमाण कमी असल्यामुळे वजन कमी करण्याच्या आहारामध्ये त्यांचा समावेश केला जातो. यामुळे पोट भरल्याची भावना अधिक काळ राहते. कारल्याच्या रसामध्ये स्थौल्यत्व कमी करण्याचे गुणधर्म आहेत.
  • कारले हा नैसर्गिक उपाय असून, त्यातील अन्य वाईट परिणाम दिसत नाहीत.

महत्वाच्या बातम्या –