एकदम फ्रेश कलर असलेली संत्री पाहिल्यानंतर आपले मन प्रसन्न होते. हे फळ खाण्यात जेवढे स्वादिष्ट असते तेवढेच ते आरोग्यवर्धकदेखील आहे. एका व्यक्तिला जेवढ्या व्हिटॅमिनसी सीची आवश्यकता असते ती, दररोज एक संत्री खाल्ल्यावर पूर्ण होते. दररोज एक संत्रीचे सेवन केल्याने शरीर तंदूरुस्त राहते. त्वचा उजळते आणि सौंदर्यात वृध्दी होते. यासोबतच हे अनेक रोगांसाठी रामबाण उपायांचे काम देखील करते. चला तर मग जाणून घेऊ फायदे….
- रोज एक संत्रे खाल्ल्याने दिवसभरात शरीराला लागणारे व्हिटामिन सी मिळते. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते.वाढत्या वयाप्रमाणेच त्याच्या खुणा शरीरावर दिसू लागतात. वाढत्या वयाच्या खुणा कमी कऱण्यासाठी दररोज ताज्या फळांचे सेवन करावे. दररोज संत्रे खाल्ल्याने त्वचा तुकतुकीत होते.
- कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह व ‘अ’ आणि ‘ब’ जीवनसत्त्वे या शरीररक्षक अन्नघटकांनी संत्रे परिपूर्ण असल्याने निरोगी राहण्यासाठी व शरीराच्या वाढीसाठी संत्री बहुमोल आहे.
- संत्रीचे सेवन केल्याने सर्दी दूर होते. यासोबत कोरडा खोकला दूर करण्यात देखील संत्री मदत करते. हे ओला खोकला असलेल्या कफला पातळ करुन बाहेर काढते.
- थकवा दुर होतो, तसेच पचनक्रिया सुधारते.
- तापामध्ये पचनशक्ती मंदावते व त्यामुळे जीभेवर पांढरा थर जमा होतो. अशा अवस्थेत संत्रे आतील सालीसह चावून खावे. यामुळे जीभेचा पांढरा थर निघून तोंड स्वच्छ होते व मंदावलेली पचनशक्ती सुधारते.
महत्वाच्या बातम्या –