रोग प्रतिकारशक्ती कशी वाढवाल? जाणून घ्या

रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होण्याची वेगवेगळी कारणे असू शकता. अनेकदा खाण्या-पिण्यात हलगर्जीपणामुळेही रोगप्रतिकारक शक्ती कमजोर होते. अनेकदा तर नशेचे पदार्थांच्या सवयीमुळे आणि अनेकदा जन्मताच तुम्हाला ही समस्या असू शकते. आता प्रश्न असा उभा राहतो की, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत कशी ठेवायची. तर चला जाणून घेऊ रोगप्रतिकारक वाढवाय चे उपाय…

जाणून घ्या ओव्याचे ‘हे’आरोग्यदायी फायदे

  • कच्चा लसूण खाल्ल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती बूस्ट करण्यास मोठी मदत होते. कारण त्यात भरपूर प्रमाणा एलिसिन, झिंक, सल्फर, सेलेनियन आणि व्हिटॅमिन ए व ई आढळतात.
  • व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी फार महत्वाचं असतं. याने वेगवेगळ्या रोगांशी लढण्याची शक्ती मिळते. सोबतच हाडेही मजबूत होतात आणि हृदयासंबंधी आजारही दूर राहतात. त्यामुळे व्हिटॅमिन डी घेणं गरजेचं आहे.
  • हिरव्या पालेभाज्या, वेगवेगळी मोसमी फळे, दूध यांचा आहारात नियमित समावेश कराल तर तुम्हाला शरीरासाठी पोषक तत्व नियमित मिळतील. या पोषक तत्वांमुळेच रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहण्यासही मदत मिळते.
  • ग्रीन टी आणि ब्लॅक टीन दोन्हींमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास फार मदत होते. पण म्हणून याचं फार जास्त सेवन करावं असं नाही. दिवसातून केवळ दोन कप सेवन करावं. जास्त प्रमाणात यांचं सेवन कराल नुकसानच होऊ शकतं.
  • नियमित दह्याचं सेवन केल्यानेही रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते. सोबतच याने पचनक्रियाची सुरळीत राहण्यात मदत होते. म्हणजे दही खाल्ल्याने तुमचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या –

दही खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे

महाराष्ट्रात आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता