ओमिक्रॉनला वेळवर रोखलं नाहीतर आपल्याला मोठ्या प्रमाणात संसर्गाला सामोरं जावं लागेल – राजेश टोपे

मुंबई : कोरोना विषाणूचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉन (Omicron)चा शिरकाव भारतामध्ये झाला असून देशामध्ये ओमिक्रॉनची लागण झालेले रुग्ण आढळून आले आहेत. महाराष्ट्रातही या विषाणूने शिरकाव केला आहे. त्यामुळे राज्याची चिंता वाढवली आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून आरोग्यविभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.

या प्रकरणी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. डोंबिवलीतील तरुणाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे. त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. पण, ओमिक्रॉनला वेळवर रोखलं नाहीतर आपल्याला मोठ्या प्रमाणात संसर्गाला सामोरं जावं लागेल. ओमिक्रॉनला थांबविण्यासाठी आम्ही सर्व उपाययोजना करत आहे. परंतु मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्ससोबत बैठक घेतल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.

महत्वाच्या बातम्या –