Share

डोळ्यांच्या समस्या होत असेल तर करा ‘हा’ उपाय, जाऊन घ्या

वाढता ताणतणाव, निद्रानाश, आणि आपली आधुनिक जीवन शैली यामुळे आपल्या आरोग्यावरती विपरीत परिणाम होतो. आणि त्या सोबतच आपल्या चेहऱ्यावरती सुद्धा याचे परिणाम दिसून येतात. या सगळ्याचा दुष्यपरिणाम आपल्या डोळ्यांवरती होतो. आणि डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात.

डोळ्यांखाली येणाऱ्या या काळ्या वर्तुळावर कोणते घरगुती उपाय करू शकतो. याची माहिती आपण घेऊया. काकडीच्या थंडगार चकत्या डोळ्यांवर २० मिनिटे ठेवल्याने डोळ्याखालील काही वर्तुळ दूर होण्यास मदत होते. याचप्रमाणे डोळे बंद करून गुलाब पाण्यात भिजलेले कापसाचे बोळे डोळ्यांवरती १५ मिनिट ठेवल्यानंतर डोळ्यांवरील त्वचा स्वच्छ होते.

तसेच थंड दुधामध्ये भिजलेले बोळे डोळ्यांखालील १५ मिनिट ठेवल्याने काळी वर्तुळे कमी होण्यास मदत होते. हा उपाय दिवसातून २-३ वेळा करावा. कापसाच्या बोळ्याने लिंबाचा रस डोळ्याखाली काळ्या डागांवर लावल्यानंतर १० मिनिटांनी थंड पाण्याने स्वच्छ धुवा. सकाळी आणि रात्री असे दोन वेळा हा उपाय केल्याने नक्कीच फायदा होईल.

ताज्या कोरफडीच्या गराने डोळ्यांखाली हळूवार मसाज केल्यानेही डोळ्यांखालील काळी वर्तुळ कमी होण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या – 

आरोग्य मुख्य बातम्या विशेष लेख

Join WhatsApp

Join Now
krushinama fevicon