यवतमाळ : जिल्ह्यातील स्वस्त भाव दुकानावर धान्य वाटपादरम्यान मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिका धारक लाभार्थी यांची गर्दी होते. त्यामुळे ज्या लाभार्थींनी कोविड लसीचे दोन्ही डोस पुर्ण केले. अशा लाभार्थींना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या आहेत. त्यामुळे शिधापत्रिका धारकांनी लसीकरण पूर्ण करावे असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्यामुळे राज्य शासनाकडून कोरोना आजारासाठी लसीकरण कार्यक्रमाची अंमलबजावणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील २ हजार ४१ रास्त भाव दुकानावर धान्य वाटपादरम्यान मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिका धारक लाभार्थी यांची गर्दी होत असते. राशन धान्य दुकानात कोरोना बाधित लाभार्थी आल्यास इतरांना या रोगाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे स्वस्त भाव दुकानदाराकडे धान्य घेण्यासाठी येणाऱ्या शिधापत्रिका लाभार्थ्यांपैकी कोविड लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रथम प्राधान्य देण्यात यावे.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात कोरोना लसीकरण सत्राचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात येत आहे. लसीचा एकही डोस न घेतलेल्या शिधापत्रिका धारकांना लसीचे डोस घेण्याबाबत प्रोत्साहित करावे. याअनुषंगाने तालुकास्तरावर कार्यवाही तात्काळ सुरू करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या –
- अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेला एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – राजेंद्र शिंगणे
- समाज कल्याण बोर्ड अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावणार – यशोमती ठाकूर
- सर्दी-खोकला बरा करण्यासाठी काय कराल? जाणून घ्या
- राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; महसूल व वन विभागाचा शासन निर्णय जारी
- राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव दराने मदत मिळणार; अतिवृष्टीग्रस्तांना तब्बल २ हजार ८६० कोटींचा निधी मंजूर