मनुक्याच्या पाण्याने वाढवा रक्त, दूर ठेवा ‘या’ समस्या

मनुका किंवा बेदाणा (plum) ही अर्धवट वाळवलेली द्राक्षे असतात. काळ्या बेदाण्यांना मनुका म्हणतात. पिवळ्या रंगाचे बेदाणे बहुधा थॉमसन, सोन्नाक्का, ताशी गणेश, माणिक्यमन या जातींच्या द्राक्षांपासून बनवले जातात. माणिक्यमन ही द्राक्षे केवळ बेदाणे तयार करण्यासाठी पिकवतात. शरद या जातीच्या काळ्या द्राक्षांपासून काळ्या मनुका बनतात.

मनुक्यांच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने हृद्य रोगापासून तुम्ही वाचू शकतात. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये कॉलेस्ट्रॉल कमी होते आणि स्ट्रोक, उच्च रक्तदाबाच्या समस्यांपासून तुम्ही वाचू शकता. जर पोट साफ होण्याचा त्रास होत असेल तर रोज रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे गॅस एसिडीटीची समस्या दूर होण्यास मदत होईल. सतत पोट साफ व्यवस्थित होईल.

  • मनुकांमधील फायबर्समुळे हे पचनशक्ती चांगली राहते. यात लोह असतात. त्यामुळे रक्ताची कमतरता दूर होण्यास मदत होते.
  • मनुकांमधील कॅरोटिन द्रव डोळ्यांसाठी फायदेशीर आहे.
  • यात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते. दररोज मनुका खाल्ल्यास शरीरातील टॉक्सिन्स दूर होऊन केसगळतीची समस्याही दूर होते.
  • हृद्यविकाराचा त्रास असल्यास त्यात मनुका फायदेशीर आहेत.
  • मनुका खाल्ल्याने रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

महत्वाच्या बातम्या –